जत,संकेत टाइम्स : जत शहरात नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.शहरात अनेक सुविधाचा वणवा आहे.डांस वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,यात तात्काळ बदल व्हावेत,या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी,जत शहरातील पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक उमेश सांवत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कचरा ठेक्याचा कारभार सुसूत्रित व काटेकोर करण्यात यावा.मंजूर कामांना त्वरीत वर्क ऑर्डर देणेत याव्यात.कचरा ठेक्याला मुतदवाढ न देता नवीन टेंडर काढावे.शहरात सर्वत्र स्ट्रीट लाईट त्वरीत बसविण्यात यावे.शहरात डास निर्मुलन फवारणी करणेत यावी.आवश्यक तेथे तात्काळ मुरूमीकरण करणेत यावे.जत शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे,त्यामुळे
मुख्य बाजार पेठ व गर्दीच्या ठिकाणे सी.सी.टिव्ही बसविण्यात यावे,अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी तसे नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.
उमेश सांवत म्हणाले, जत शहर मोठे आहे,मात्र त्याप्रमाणात सोयी-सुविधा देण्यात नगरपरिषद कमी पडत आहेत.शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे.सातत्याने ठेके दिले जातात.मात्र स्वच्छतेबाबत उदासीनता कायम आहे.डांसाचे प्रमाण वाढल्याने साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत.याबाबत आम्ही वारवांर तक्रारी करत आहोत.मात्र प्रशासन गेढ्यांच्या कातडीचे झाल्याने नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. यापुढे असे प्रकार थांबावेत अशी मागणी आम्ही यावेळी निवेदनाद्वारे केली आहे. यात बदल न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
यावेळी सभापती प्रकाश माने,नगरसवेक,मिथून भिसे आण्णा शिंदे,गौतम ऐवळे,सद्दाम आत्तार,संतोष कोळी,सुरेश शेगुणसे,संतोष मोटे,अजिक्य सांवत आदी मान्यवर उपस्थित होते.
जत नगरपरिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.