सामाजिक न्यायचा अखर्चित निधी इतत्र न वळविण्याचा कायदा करण्याची मागणी

0
जत,संकेत टाइम्स  : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागच्या दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या सहा वर्षांत अनुसूचित जातीचे अखर्चित १४ हजार १९८ कोटी रुपये परत गेले आहेत. त्यामुळे यापुढे आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याने ज्याप्रमाणे अनुसूचित
जातीचा निधी इतरत्र न वळवण्याबाबत जसा कायदा केला तसा महाराष्ट्रात करण्याची मागणी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

 

गेल्या पाच वर्षांत सामाजिक न्याय विभागाचे अनुसूचित जातीचे अखर्चित १४ हजार १९८ कोटी परत गेले.सध्या २०२१ साठी लोकसंख्येनुसार १३ हजार ५७० कोटी रुपये गरजेचे आहेत, परंतु तरतूद ९ हजार ६६८ कोटी रुपयांची केली. जवळपास ३ हजार ९०२ कोटी रुपये नाकारण्यात आलेत. सारथी व महाज्योतीप्रमाणे बार्टीसाठी निधी वाढवण्याची गरज आहे.आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याने अनुसूचित जातीचा अखर्चित निधी इतरत्र न वळविण्याबाबत कायदा केलेला आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचा असा कोणताही कायदा नाही.त्यामुळे राज्यातील अखर्चित निधी इतरत्र वळवण्यात येऊन अनुसूचित जातीचे नुकसान केले जात आहे. केरळ राज्याप्रमाणे परदेशी शिक्षणासाठी
सरसकट सर्व विद्यार्थ्यांनाही लाभ देण्याची मागणी श्री.कांबळे यांनी केली.
Rate Card
सामाजिक न्यायचा अखर्चित निधी इतत्र न वळविण्याचा कायदा करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे भूपेंद्र कांबळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.