जत पंचायत समिती बनली लुट्टीचा अड्डा | रोजगार हमी योजना विभाग पुन्हा चर्चेत‌; रस्त्याच्या बिलासाठी अडवणूक

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील राज्यभर गाजलेल्या भष्ट्राचारानंतर पुन्हा जत पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेलची हवा खावी लागली होती.मात्र यातून सुधारतील ते कर्मचारी कसले असा काहीसा प्रकार पुन्हा समोर आला आहे.
बालगाव ता.जत येथील शेतकरी भाऊराया आण्णाप्पा मोरे यांच्याकडून रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामासाठी प्रस्ताव तयार करून देण्यासाठी रोजगार हमी विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठी रक्कम घेऊनही प्रस्ताव करून दिला नाही.त्यामुळे त्रस्त शेतकरी मोरे यांनी याबाबत गटविकास अधिकारी दिनकर खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे,रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या बालगाव ते जीगजेणी रस्त्याचे मुरमीकरणाचे काम भाऊराया मोरे यांनी पुर्ण केले आहे.९ फेंब्रुवारी २०२१ ला या कामाचे पहिल्या मस्टरचे बिल देण्यात आले आहे. त्यानंतर शेवटचे बिल मिळावे म्हणून मोरे यांनी २३ जूलै २०२१ ला मस्टर दिले आहे.
मात्र संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांने एम.बी.हरविला आहे.मोरे बिलासाठी गेल्या तीन महिन्यापासून हेलपाटे‌ घालत आहेत.मात्र संबधित कर्मचारी थात्तूर मात्तूर उत्तरे देऊन हेळसाड करत आहेत.संतप्त झालेले मोरे यांनी अखेर गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
पंचायत समिती लुट्टीचा अड्डा
जत पंचायत समिती लुट्टीचा अड्डा बनली आहे.येथे ग्रामपंचायतीची बिल काढण्यापासून ग्रामसेवक,कर्मचाऱ्यांची बिले काढण्यासाठी, शिक्षण,पीएम घरकूल योजना,पाणीपुरवठासह सामान्य प्रशासनात अधिकारी,कर्मचारी थेट पैसे मागतात,पैसे न दिल्यास कामे त्रूटी काढून  रखडवली जात आहेत.या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने सर्वच विभागात भ्रष्ट कारभार राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.