बेळोंडगीत गोठ्यावर वीज पडून ६ शेळ्याचा मुत्यू | ७५ हजाराचे नुकसान
करजगी,संकेत टाइम्स : बेळोंडगी ता.जत येथील शेतकरी माळाप्पा विठोबा कटरे यांच्या शेळ्याच्या गोठ्यावर विज पडून ५ शेळ्या,१ मेंढीचा मुत्यू झाला आहे. यात ७५ हजार रूपयाचे नुकसान झाले आहेत.घटना बुधवारी मध्यरात्री घडली.बेंळोंडगी येथील माळाप्पा कटरे यांचा सर्व्हे नंबर ५२ मध्ये घर व लगत शेळ्याचा गोठा आहे.
मंगळवारी मध्यरात्री गडगडाटासह आलेल्या पावसात अचानक गोठ्यात वीज पडली त्यात दुर्देवाने ५ शेळ्या,१मेंढी जागीच ठार झाली.यात ७५ हजाराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही.घटनेचा पंचनामा तलाठी बाळासाहेब जगताप,बोर्गीचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी करून नुकसानीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे कटरे यांचे नुकसान झाले असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.