जत चोरीतील एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील महाराणा प्रताप चौका नजिक झालेल्या दीड लाख चोरीतील संशयिताला जत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.संशयित चोरटा मुंबई येथील असून त्यांने पोलीसांना चोरीची कबूली दिल्याचे समजते.
जत शहरातील उमराणी चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबाहेर पाळत ठेवून चोरटे पैसे लुटत होते.गेल्या महिन्याभरात अशा तीन घटना घडल्या होत्या.पोलीसांनी यांचे गांभिर्य घेत चोरट्याचा मागावर एक पथक लावले होते.बँकेबाहेर संशयास्पद फिरणाऱ्या या चोरट्याला पोलीसांनी हाटकले मात्र त्यांने तेथून पळ काढला,मात्र पोलीसांनी त्यांचा पाटलाग करून त्याला पकडले आहे. दरम्यान त्यांच्याकडून शहरासह तालुक्यातील आणखीन काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे.त्यासाठी पोलीसांनी अंग झटकून तपास करण्याची गरज आहे.