बेंळूखीत स्वतंत्र तलाठी,कोतवाल नेमा | ग्रामस्थाचे प्रांताधिकारी यांना निवेदन

0
3

डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथे नेमलेले तलाठी गेल्या वर्षापासून डफळापूर, जत येथून कारभार हाकत असल्याने शेतकरी,नागरिकांचे आर्थिक नुकसान व वेळ वाया जात आहे.नुकतेच नव्याने नेमलेले तलाठीतर थेट जत येथून कारभार चालवत आहे.जतचे तलाठी भवन सध्या त्याचे‌ कार्यालय असून गावातील नागरिकांना सातबारा,विविध दाखले काढण्यासाठी तब्बल 25 किलोमीटररील जत जावे लागत आहे.

मुळ डफळापूरचे असलेले कोतवाल गेल्या दोन वर्षापासून असाध्य आजाराने आजारी असल्याने अडचणीत आणखीन भर पडली आहे.
दरम्यान याबाबत मंडल अधिकारी, तहसीलदार यांना यांची वारवांर कल्पना देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले असून असा कारभार करणाऱ्या तलाठी व कोतवालाना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभयं मिळत असल्याने नेमून दिलेल्या गावापेक्षा तहसील कार्यालयात त्याचा तळ संशय वाढविणारा आहे.
तातडीने बेंळूखीला कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी व कोतवाल नेमावेत अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा, ग्रामस्थांनी दिला आहे.तसे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे.संरपच संभाजी कदम,शंशिकात जाधव,मारूती माळी,ग्रा.प.सदस्य चंद्रकांत चव्हाण,अमोल माळी शामराव चव्हाण, अशोक माळी आदीच्या सह्या आहेत.
सुसज्ज चावडी
बेंळूखीत गेल्या सात वर्षापुर्वी सुसज्ज चावडी बांधण्यात आली आहे. मात्र इमारत बांधल्यापासून येथे एकही दिवस तलाठी बसलेले नाहीत,विशेष आहे.अशीच स्थिती तालुक्यातील अन्य‌ गावातील आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here