सोनलगीतील मयत कुंटुबियास उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशनकडून मदत

0

 

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील गोरगरीब,निराधार, वेगवेगळ्या समाज्यातील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे मुळे ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी “एक हात मदतीचा ” म्हणून जत तालुक्याचे कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर सर आणि  त्यांच्या पत्नी संस्थेचे चेअरमन सौ.डॉ. वैशाली सनमडीकर यांनी केला आहे. काकांच्या स्मरणार्थ श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत,च्या वतीने, ‘सामाजिक कृतज्ञता निधी ‘ म्हणून रोख रक्कम देण्याची सुरुवात करण्यात आली.

 

त्याची सुरुवात परवा सोनलगी गावातील अपंग महिला सोनाली तुकाराम कांबळे यांचे बोर नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली.त्यांच्या कुटूंबाला आर्थिक पाठबळ म्हणून रोख स्वरूपात मदत करण्यात आली.त्याशिवाय अनाथ‌ दोन्ही मुलांना संस्थेच्या‌ शाखेत १२ वी पर्यत शिक्षण मोफत देण्यात येणार आहे.

 

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक पाटील सर,प्राचार्य दशरथ वाघमारे सर,नाजीभाई नदाफ, सोनगली गावचे सरपंच राजु कांबळे, जत पंचायत समितीचे महिला व बालकल्याण समिती चे पदाधिकारी इराणा जेवुर हे उपस्थित होते.भविष्यात ही अशा आकस्मिक घटनेतील पिडितांना कालकथित उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने मदत केली जाणार आहे.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. प्रशांत कांबळे सर यांनी केले.

 

“एक हात मदतीचा” उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणार
कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी तहयात सामाजिक बांधिलकी जपली होती.प्रत्येक गोर गरीब,गरजूंना ते मदत करत असतं.त्याच्या पश्चात त्यांची समाजाशी असलेली बांधिलकी कायम राखत आम्ही काकांच्या स्मरणार्थ श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत,कडून, ‘सामाजिक कृतज्ञता निधी’च्या माध्यमातून गरजू,पिडितांना मदत करणार आहोत.
 डॉ.कैलास सनमडीकर
अध्यक्ष,श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत
Rate Card
जत : सोनलगीतील मयत कुंटुबियास श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशनकडून मदतीचा चेक देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.