..असेही मायलेकाचे प्रेम,मुलाचा सकाळी मृत्यू,आईने सध्याकांळी प्राण सोडला

0
आंवढी,संकेत टाइम्स : मायकेलाच्या अनेक घटना देशभरात घडत आहेत.एकीकडे रक्ताची नाती विसरली जात असताना आंवढी ता.जत येथे मुलाच्या मृत्यूनंतर विरहाने १२ तासात आईने प्राण सोडला,धावत्या युगात ही घटना आजही मायलेकाची नातं किती घट्ट आहेत,हे स्पष्ट झाले आहे.

 

 

 

 

आंवढी येथील शेतकरी साहेबराव हरिबा कोडग (वय ५५)यांचे गुरूवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या ९५ वर्षीय आईला हा मोठा धक्का बसला होता.मुलाच्या विरह सहन न झाल्याने अखेर श्रीमती इंद्रायणी हरिबा कोडग यांनी संध्याकाळी प्राण सोडला.

 

 

 

एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाल्याने कुंटबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
Rate Card
दोघाच्या अस्थिचे विसर्जन रवीवारी सकाळी  ७ वाजता आंवढी येथे होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.