…अखेर बँक व्यवस्थापनाची शरणागती | स्वा.शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश | चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक

0
जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या शाखाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात गुरूवार पासून सुरू असलेल्या स्वा.शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले असून शुक्रवारी आंदोलकांच्या आक्रमकतेपुढे बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाने सपशेल शरणागती पत्करत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या असून सर्व मागण्याच्या चौकशीसाठी सक्षम अधिकारी नेमून दोषी संबधितावर एका महिन्याच्या आत‌ कारवाई करू असे लेखी पत्राद्वारे आश्वासन कोल्हापूर विभागाचे झोनल ऑफिसर श्री.प्रसाद व सांगलीचे वरिष्ठ अधिकारी यांनी  दिले,असल्याची माहिती स्वा.शेतकरी संघटनेचे नेते भिमाशंकर बिराजदार यांनी दिली.

 

 

 

 

 

संखच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या शाखाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा गेल्या काही महिन्यापासून छळ सुरू होता.कर्ज मंजूरीसाठी ते पैसे घेत‌ असल्याचे आरोप आंदोलकांचे होते.त्याशिवाय काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज दिल्याचा बोजा चढवूनही कर्ज दिले नव्हते. संख मधील दोघा एंजन्टाकडून आलेल्या शेतकऱ्यांनाच कर्ज मंजूर केले जात होते.त्यात शाखाधिकारी पैसे घेत  असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते.

 

 

 

शुक्रवारी आंदोलकांनी ढोलकी बजाव आंदोलन करत बँकेसमोर ठिय्या मांडला होता.मात्र मुर्दाड बँक व्यवस्थापनाने पहिल्या दिवशी आंदोलनाची दखल घेतली नाही.त्यामुळे संतप्त आंदोलकांनी दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू केले.आंदोलनाला मिळालेला वाढता पांठिबा पाहून अखेर बँक व्यवस्थापन नरमले.त्यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करत,यांची चौकशी करण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्यात येईल त्यांच्याकडून एक महिन्याच्या‌ आत चौकशी करून संबधितावर कारवाई करू,असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेतल्याचे बिराजदार यांनी सांगितले.

 

 

 

 

यावेळी सिध्दगोंडा बिराजदार,मल्लिकार्जुन बिराजदार,परगोंडा बिराजदार,सायबाण्णा ककमरी,विठ्ठल कुंभार,रायगोंडा शिळीन,राजकुमार बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान तुकाराम बाबा यांनी आंदोलकांनी पाठिंबा दिला.
संख शाखेचे शाखाधिकारी यांना संख येथील रावसाहेब शिळीन या शेतकऱ्यांने  घातलेल्या दुधाचे बिल कर्ज मंजूर करून देतो म्हणून दिले नव्हते.ते पैसे दररोज १०० रूपये प्रमाणे १२ हजार झोन ऑफिसर श्री.प्रसाद यांच्याहस्ते शेतकरी शिळीन यांना आंदोलन स्थळी परत देण्यात आले.
संख ता.जत येथील बँक शाखाधिकाऱ्या विरोधातील आंदोलकांना लेख पत्र देताना कोल्हापूर विभागाचे झोनल ऑफिसर श्री.प्रसाद २) संख शाखेचे शाखाधिकारी यांनी रावसाहेब शिळीन या शेतकऱ्यांचे दुधाचे बिल यावेळी देण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.