केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांची उमदीतील श्रीसंत भाऊसाहेब मठास भेट

0
उमदी : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उमदी ता.जत येथील श्रीसंत भाऊसाहेब मठास सदिच्छा भेट दिली.

 

 

त्यांनी अचानक जत दौरा केला.ना.जावडेकर यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.माजी सभापती तम्मनगौडा रविपाटील,संजय तेली,डॉ.बार्शीकर,चिदानंद संख,सिदराया शिंदे,व विठ्ठल बिराजदार,संगम ममदापुरे, अभिमन्यू लोणी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

यावेळी संजय तेली यांनी महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणाऱ्या विजयपुर ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर चालू याबाबत निवेदन देण्यात आले.त्याशिवाय जत तालुक्यातील सिंचन योजना,रस्ते,विजसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.जतचे प्रश्न केंद्र सरकारकडे मांडू,असे आश्वासन यावेळी ना.जावडेकर यांनी दिले.

 

 

केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा उमदी येथे सत्कार करताना माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील, संजय तेली आदी
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.