नैसर्गिक संकटे वाढणार पैशाच्या हव्यासापोटी डोंगरांना सुरुंग | जत तालुक्यातील प्रकार

0

जत,संकेत टाइम्स : ग्लोबल वाॅर्मिंगचा धोका टळलेला नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासन करीत आहे. झाडे लावा-झाडे जगवा या मोहिमेत कोट्यवधींची वृक्षलागवड करण्यात येत आहे, तर दुसरीकडे हप्ताखोर कर्मचारी ते अधिकारी पैशांच्या हव्यासापोटी गप्प आहेत.दिवसाढवळ्या डोंगर पोखरून गौण खनिजाची चोरी सुरू आहे.

 

 

 

 

मेळघाटच्या पायथ्याशी पर्यावरणाचा खेळ दररोजच खेळला जात आहे. ज्यांना शासनाने अधिकार दिले, त्यातील काहींचे तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. लालसेच्या छोट्याशा तुकड्यावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे.अनेक गावच्या डोंगरात गौण खनिज तस्करांचा धिंगाणा अनेक महिन्यांपसून सुरू आहे.

 

 

 

डोंगर पोखरले गेले आहेत. स्टोन क्रशरसाठी परवानगी देऊनही जागा कमी पडली की काय, म्हणून अनेक शेतजमिनी सपाटी करण्यासाठी परवानगी दिली गेली. त्यावरील गौण खनिजाचा महसूल शासनाला तर मिळाला नाहीच, मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात किरकोळ रक्कम ओतून तस्करांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती पळविली.अनेक नियम यासाठी धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र आहे. यावर जिल्हा खनिकर्म विभागाने सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे.

 

पर्यावरणाचे कोणालाच काही पडले नाही
डोंगररांगा आणि डोंगराचा पायथा हे संवेदनशील आहेत. त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे.काही उंच टेकड्यांचा विध्वंस होणे योग्य नाही. महसूल विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी.

– पर्यावरणतज्ज्ञ

Rate Card
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.