तासगाव तालुक्यातील अवकाळीग्रस्तांना नुकसान भरपाई द्या ; भाजपचे तहसीलदारांना निवेदन | मागणी मान्य न झाल्यास आंदोलन

0
तासगाव : ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यातील गावागावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र नुकसान होऊन वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. ही नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी भाजपचे तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे क्षेत्राध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार रवींद्र रांजणे यांना दिले आहे. तातडीने नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तहसीलदार रांजणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तासगाव तालुक्यात ऑक्टोबर 2020 मध्ये अवकाळी पाऊस कोसळला. या अवकाळीमुळे तालुक्यातील गावागावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावेळी नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र आजही अनेक गावांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.

 

तालुक्यातील सावळज, सिद्धेवाडी, वाघापूर, सावर्डे, वासुंबे, वायफळे, हातनूर, विजयनगर, हातनोली या गावातील शेतकरी तहसील कार्यालयाकडील अनास्थेमुळे आजही नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.
या गावातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.