कोन आवरणार राष्ट्रीयकृत्त बँक कर्मचाऱ्यांना | खातेदाराचा छळ : नियम ढाब्याबर बसवून मनमानी  

0
Rate Card
जत,संकेत टाइम्स : 1 नोव्हेंबर 2021 पासून राष्ट्रीयकृत बँका 9 वाजेपासून सुरू करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. मात्र जत तालुक्यातील राष्ट्रीयीकृत
बँकांनी हारताळ फासला आहे.वेळीची मर्यादा कोणतीही बँक पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. बँकेचे कार्यालय वेळेअगोदरच बंद केले जात,तर सकाळीही उघडण़्याची वेळ पाळली जात नाही.अनेकवेळा सकाळी 12 वाजेपर्यत काही कर्मचारी उपस्थित नसल्याचे समोर येत आहे.

 

 

 

ग्रामीण भागातून आलेले नागरिक दरवाजाजवळ बँक उघडण्याची प्रतीक्षा करीत आहेत.जत तालुक्यात  राष्ट्रीयकृत बँकेच्या माफक शाखा आहेत.जत तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्र,बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,भारतीय स्टेट बँकाच्या जत,शेगाव,डफळापूर, उमदी,संख,माडग्याळ, जाड्डरबोबलाद आदी ठिकाणी राष्ट्रीयकृत्त जुन्या बँक आहेत.या बँकात अनेक ग्रामीण भागातील नागरिकांची बँक खाती आहेत.

 

 

 

श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे सानुग्रह अनुदान याच बँकेच्या खात्यात जमा होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक पैसे काढण्यासाठी या बँकेत येतात. या बँकांची चांगली उलाढाल आहे. मात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे खातेदार कमालीचे त्रस्त आहेत. यातील अनेक कर्मचारी ये-जा करतात. विशेष म्हणजे, ठरवून दिलेल्या वेळेच्या उशीरा बँक उघडली जाते व लवकरच बंद केली जाते.काही बँकात दुपारच्या सुमारे एक तासाची विश्रांती घेतात.एखाद्या खातेदाराने या अनागोंदी कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केल्यास त्याला दमदाटी देण्यासही येथील कर्मचारी मागे-पुढे पाहत नाही.दुर्गम भागातील गरिब नागरिक अन्याय झाला तरी सहजासहजी तक्रार करीत नाही. याचा पुरेपूर गैरफायदा येथील कर्मचारी व अधिकारी घेत आहेत.ग्रामीण भागातून आलेले नागरिक बँक उघडण्याची प्रतीक्षा करीत होते.बऱ्यांच वेळा बँकेतील शिपाई कर्मचारी यांच्या मनाला वाटेल तशा बँक सुरू केल्या जात आहेत.

 

 

 

बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे खातेदार कमालीचे त्रस्त आहेत. या राष्ट्रीयकृत्त बँकेच्या व्यवस्थापनाने या बँकेला आकस्मिक भेट देऊन चौकशी केल्यास येथील अनागोंदी कारभार उघड होईल.

मँनेजरची उपस्थिती १२ वाजता
जत तालुक्यातील राष्ट्रीयकृत्त बँकेतील अधिकाऱ्याचा बेजबाबदार पणा वाढला आहे.अनेक बँक अगदी १२ वाजेपर्यत अधिकारी येत नसल्याचे वास्तव आहे.तोपर्यत खालचे‌ कर्मचारी कसाबसा कारभार चालवितात.मात्र खातेदारांची ओरड त्यांना खावी लागत आहे. काही बँकात तर असे प्रकार नित्याचे झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.