…असाही प्रामाणिकपणा,हरविलेले सोन्याचे दागिणे दिले परत दिले परत

0
जत,संकेत टाइम्स : प्रामाणिक माणसे आजच्या या युगात आहेत.यांचे उदाहरण डफळापूर येथे‌ गुरूवारी समोर आले.आठवडा बाजारासाठी आलेल्या एका महिलेचे भाजीपाला खरेदी करताना गंठण गळ्यातून तुटून पडले.ते डफळापूर येथील शांताप्पा आवटी यांना सापडले होते.त्यांनी जवळचे व्यापारी व जवळच्या काही महिलाकडे चौकशी केली मात्र त्यांनी हे गंठण आमचे नसल्याचे सांगितले.

 

 

याबाबतची माहिती आवटी यांनी गौस मकानदार यांना दिली.त्यांनी वेळ न घालवता थेट‌ बाजारातील मशिदीतील लाऊटस्पिकर मधून आम्हाला एक सोन्याचे गंठण सापडले आहे, कुणाचे हरविले असेलतर संपर्क साधण्याचे आवाहन केले.सोशल मिडियावरूनही आवाहन केले होते.

 

 

 

दुसऱ्या दिवशी अखेर गंठण हरविलेल्या महिला यांनी शांताप्पा आवटी व गौस‌ मकानदार याच्यांशी संपर्क केला.महिलेने दागिण्याची ओळख दिल्याने त्यांनी ते गंठण त्या महिलेला परत दिले.
दरम्यान शांताप्पा आवटी यांच्या प्रामाणिक पणाबद्दल त्यांनी कतृज्ञता व्यक्त करत आभार मानले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.