विटा : विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार गणेश संभाजी तुपसौंदर्य टोळीस पोलीस अधीक्षक,दिक्षीत गेडाम यांनी सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातून १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.टोळी प्रमुख गणेश संभाजी तुपसौंदर्य,(३५ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता.खानापूर),सुरज मनोज कांबळे,(वय २१ वर्षे,रा.फुलेनगर, विटा, ता.खानापूर),प्रमोद मधुकर यादव,(ब ३० वर्षे, रा. कराड),रोहित शाम कांबळे,(वय २४ वर्षे, रा. फुलेनगर विटा, ता.खानापूर),गणेश अशोक घेवदे,(वय २५ वर्षे, रा.फुलेनगर,विटा,ता.खानापूर),आकाश ऊर्फ अतिश राजु वायदंडे,(वय -१९ वर्षे, रा. फुलेनगर, विटा, ता.खानापूर) असे हद्दपार केलेल्या टोळीतील साथीदाराची नावे आहेत.
विटा पोलीस ठाणे हद्दीत या टोळीविरुद्ध सन २०२० मध्ये शेतजमिनीतील, विहीरीवरील पाण्याची मोटार व एच.टी.पी पंप चोरणे,गुरे चोरी करणे असे ३ मालमत्ते विरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.नमुद सामनेवाले हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक,विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, विटा विभाग विटा यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा, त्यांच्या हालचाली, टोळीतील सदस्यांनी दिलेले म्हणणे, या बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन,नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन
गणेश संभाजी तुपसौंदर्य, सुरज मनोज कांबळे, प्रमोद मधुकर यादव,रोहित शाम कांबळे,गणेश अशोक घेवदे,आकाश ऊर्फ अतिश राजु वायदंडे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्हयातुन १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम,अपर पोलीस अधिक्षक
मनिषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड,सपोनि निरज उबाळे,स्था.गु.अ.शाखा सांगली, पोनि संतोष डोके, विटा पो.ठाणे, सपोफो सिध्दाप्पा रुपनर, पोकॉ दिपक गट्टे स्था.गु.अ.शाखा सांगली, पोना अमर सुर्यवंशी,अमोल लोहार विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.