शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू ; रतिलाल साळुंखे

0
येळवी : जत तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गट शिक्षणधिकारी रतिलाल साळुंखे व तानाजी गवारे यांनी घेतली.यावेळी शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष  रामराव मोहिते,पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष संभाजीराव जगताप, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष राजाराम सावंत,शिक्षक समितीचे नेते दिपकराव कोळी, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षिरसागर,शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष दिलीप पवार, शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत,जुनी पेन्शन संघटनेचे तालुका सरचिटणीस वागोली सर,राजु कांबळे,इंडीकर, संतोष गरुड,मुलाणी उपस्थित बैठक होते.
सातलिंग किट्टद याचा अभिनंदन ठराव झाला.जत तालुका प्राथमिक शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सुरू करण्यात येणार,सेवा पुस्तके अद्यावत करणे,७ वा वेतन आयोगाचे १७५ शिक्षकांचे विकल्प दुरुस्ती व नोंदीसाठी दिनांक२९/१०/२०२१ व १/११/२०२१ रोजी पंचायत समिती जत येथे कॅम्प लावून नोंदी घेण्याचे ठरले.वरिष्ठ वेतनश्रेणी, मेडिकल बिले, विद्युतीकरण व विद्युत बिले,आयकर,नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सत्कार समारंभ आयोजित करणे. वेतन त्रुटी दूर करणे.इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.