उमदीनजिक कर्नाटकातील तिघा भाविंकाना चारचाकी वाहनाने चिरडले | तिंघाचा मृत्यू, एक गंभीर

0

जत,संकेत टाइम्स : हुलजती ता.मंगळवेढा येथील महालिंगराया यात्रेसाठी चाललेल्या कर्नाटकातील भाविकांना चारचाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात तिघांचा दुर्देवी मुत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शऩीवारी सांयकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

 

 

बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे रा.यदभावी,ता.लिंगसूर जि.रायचूर,नागाप्पा सोमाण्णा अचनाळ,रा.देवरभूसर,ता.लिंगसूर जि.रायचूर,महाण्णाप्पा दुर्गाप्पा गोंदीकल,रा.देवभूर,ता.लिंगसूर जि.रायचूर असे मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत.

 

 

अधिक माहिती अशी,सध्या हुलजंती ता.मंगळवेढा येथील महालिंगराया यात्रा सुरू आहे.या यात्रेसाठीकर्नाटकातील रायचूर येथून भाविकांचा एक जथा पायी निघाला होता.

 

 

Rate Card

पंढरपूर ते विजापूर महामार्गावर उमदीपासून दोन किलोमीटर अंतरावरील शेवाळे वस्ती येथे पुण्याहून कुंटुबियासह विजापूर कडे निघालेल्या पोलो चारचाकी वाहन एमएच १२/८५९८ यांचा टायर फुटल्याने वाहन थेट आडवे होत भाविकांच्या दिंडी घुसल्याने झालेल्या धडकेत तिघा भाविकांचा मुत्यू झाला.

 

 

तर एका दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे.घटनास्थळी सा.पो.नि.पंकज पवार यांनी तात्काळ पोहचत जखमींना रुग्णालयात हलविले.

 

 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.