संख येथे ‘रविंद्र वस्त्र निकेतन’ च्या मिनी स्टोअर चे उद्घाटन 

0
जत : पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीचा लोकप्रिय ब्रॅण्ड बनलेल्या सलगरेतील ‘रविंद्र वस्त्र निकेतन’ ने आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी जत तालुक्यातील संख येथे मिनी स्टोअरचे उद्घाटन केले. मोठ्या शहरांसह परिसरातील ग्राहकांना सोयीची खरेदी करता यावी यासाठी विविध ठिकाणी मिनी स्टोअर्स सुरू केले आहेत.जत शहरानंतर आज संख येथे संख व परिसरातील ग्राहकांसाठी मिनिस्टोअर सुरु करण्यात आले.यावेळी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत,रविंद्र वस्त्र निकेतनचे संचालक रविंद्र अथणे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी पंचायत स़मिती सभापती बाबासाहेब कोडग,राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते सुभाष पाटील,तानाजी पाटील यासह परिसरातील प्रमुख मान्यवर यांच्याहस्ते मिनी स्टोअर चे उद्घाटन करण्यात आले.

 

 

संपूर्ण विस्तृत दालन असलेल्या या मिनिस्टोर मध्ये सर्व सेवा सुविधा मिळत असून सध्या स्टोअरमध्ये आकर्षक डिस्काउंट मध्ये वस्त्रे उपलब्ध आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी हे स्टोअर परिसरातील ग्राहकांना सोयीचे ठरणार असुन या मिनी स्टोअर मध्ये 2,499 च्या खरेदीवर बझार बँग मोफत देण्यात येत असुन दररोज शेकडो ग्राहक भेट देत आहेत.

 

‘रविंद्र वस्त्र निकेतन’ने आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलुस, जयसिंगपुर, सांगली, कवठेमहांकाळ,  कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, सांगोला, म्हैशाळ, तासगाव, सावळज, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरुर, रायबाग येथीलही आपल्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये हा ‘दिवाळी धमाका’ सुरु केला आहे.हा धमाका 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे या धमाका ऑफर्स मुळे वस्त्र खरेदी करण्यासाठी ग्राहक आकर्षीत होत आहेत.येथील मिनी स्टोअर सकाळी 9 ते सायंकाळी 8 पर्यंत ग्राहकांच्या सेवेत असणार आहे.
संख येथील मिनी स्टोअरचे उद्घाटन करताना जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, रविंद्र वस्त्र निकेतनचे संचालक रविंद्र अथणे व इतर मान्यवर
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.