हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? | युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल ; महागाईचा निषेधार्थ सायकल रँली

0

जत : सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना “अच्चे दिन” दाखविण्याचे वचन दिले होते. पण, निवडणुकीनंतर “चुनावी जुमला” म्हणत तमाम भारतवासियांना महागाईच्या खाईत ढकलले. देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना, पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे चालू आहेत.

 

 

हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन? असा सवाल करीत रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार जत तालुका युवासेनेच्या वतीने पायी व सायकल रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला.

 

 

 

Rate Card
यावेळी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे,शिवसेना संघटक अमित बाबुराव दुधाळ, युवासेना जत (पश्चिम) तालुका अधिकारी सचिन मदने, युवासेना जत शहर अधिकारी ज्ञानेश्वर धुमाळ,युवासैनिक उपस्थित होते.

 

 

 

दिनकर पंतगे म्हणाले,देशात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे.

 

 

 

भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना त्यात दर दिवशी आणखी वाढ करत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे.
जत येथील रँली दरम्यान बोलताना कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.