पेयजल योजनेच्या कामाची जि.प.च्या पथकाकडून पाहणी | सर्व कामे अतिंम टप्यात ; पुढील काही दिवसात डफळापूरकरांना मुबलक पाणी मिळणार

0
डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत पेयजल योजनेचे काम अतिंम टप्यात आहे.पाणी शुध्दीकरण प्लँटच्या कामाची पाहणी‌ कार्यकारी अभियंता श्री.कदम,उपविभागीय अभियंता श्री.काटकर यांनी या कामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती मन्सूर खतीब, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, तांत्रिक सल्लागार के.डी.मुल्ला उपस्थित होते.

 

 

 

डफळापूर येथील पेयजल योजनेच्या कामाला गेल्या काही महिन्यात गती आली आहे.योजनेचे जवळपास सर्व कामे पुर्णत्वाकडे आहेत.जलशुध्दीकरण प्लँटचे ही काम अतिंम टप्यात आले आहे.यापुर्वी गाव भाग,अनेक वाड्यावस्त्या अतर्गंत पाईपलाईन,नळ जोडण्या,
बसाप्पावाडी ते एकवीरा मंदिरा नजिकच्या टाकीपर्यतच्या मुख्य वाहिन्या,बसाप्पावाडी तलावाजवळील विद्युत जोडणी,टाक्याची कामे पुर्ण झाली आहेत.

 

 

सध्या एकवीरा मंदिरा जवळच्या जल शुध्दीकरण प्लँटचे काम गतीने सुरू आहे.त्या कामाची पाहणी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा अभियंता श्री.कदम व उप विभागीय अभियंता श्री.काटकर यांनी पाहणी केली.काही सुचनाही केल्या.जल शुध्दीकरण प्लँटजवळची विद्युत जोडणी झाल्यानंतर काही दिवसात डफळापूर करांना या योजनेतून मुबलक पाणी मिळणार आहे.
डफळापूर पेयजल योजनेच्या कामाची पाहणी करताना कार्यकारी अभियंता श्री.कदम,उपविभागीय अभियंता श्री. काटकर,महादेव पाटील,मन्सूर खतीब,दिग्विजय चव्हाण आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.