दिवाळी खरेदीसाठी जतेत बाजार गजबजला
जत : चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी विक एंडला दिवसभर ग्राहकांनी बाजार गजबजून गेला. फराळाचे साहित्य, आकाशकंदील, रांगोळी यासह कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. गेला महिनाभर तेजीत असणाऱ्या कांद्याची आवक वाढल्याने दर उतरले आहेत.नागपूर परिसरातून संत्र्यांची आवक वाढली आहे. बटाटे-लसणाचे भाव स्थिर आहेत.

शनिवार (ता.14)पासून दिवाळीला सुरवात झाली आहे. त्यामुळेच दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार म्हणून खरेदीसाठी सकाळपासून बाजार गजबजून गेला. किराणासह भुसार साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी होती. तयार फराळाचे स्टॉलही लागले होते. आकाशकंदील, विविध रंगांची रांगोळी, घर सजावटीचे साहित्य याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड दिसली.