कोराना संपला,हा गैरसमज डोक्यातून काढा ; डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी

0

जत : संपूर्ण जगाला वेड लावलेला कोरोना संपलेला आहे, असा गैरसमज डोक्यातून काढा, कोरोनासंदर्भात व लसीकरणविषयी जागरूक रहा, असे आवाहन जत येथील डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी यांनी केले.रविवारी सकाळी कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती अभियान व स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.पट्टणशेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

 

 

या रॅलीचे आयोजन आरपीआय वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहसीन इनामदार,इरफान उगारे,अभय बल्लारी,मुजावर,करे यांनी केले.
कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,विकास साबळे,डॉ.सचिन वाघ,डॉ.रवींद्र झारी, डॉ.सचिन मोगली,डॉ.विवेकानंद राऊत,डॉ.विद्याधर किट्टटद,सागर शिंगारे,दिलीप व्हनखंडे,विद्यार्थ्यांचे पालक,पोलिस,आरोग्य व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सोलनकर चौकातून या रॅलीचा प्रारंभ झाला.महाराणा प्रताप चौक,एस.टी.स्टॅण्ड मार्गे बसवेश्वर चौकात रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये तीसपेक्षा अधिक लहान मुलांचा सहभाग होता.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.