..या गावात ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ, सात घरे फोडली

0
3
आवंढी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील आवंढी येथे एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.ऐन दिवाळीत चोरट्यांनी बंद घरातील सोने, चांदी,रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज  चोरट्यानी पळविला.ही घटना दि.6 च्या मध्यरात्री घडली.दरम्यान पोलिसांनी आंवढीला भेट देत पंचनामा केला आहे.

 

 

अधिक माहिती अशी,आवंढीतील शंकर बळवंत कोडग हे दि. 5 शुक्रवारी रात्री जेवण करून 11 वाजताचे सुमारास तिघेजण घराच्या समोर झोपले होते.दि.6 सकाळी पहाटे झोपेतून 5 वाजता उठल्यानंतर त्यांना दरवाज्या उघडा दिला घरामध्ये जाऊन बघितले असता सामान आस्तावेस्त  पडलेले दिसून आले.घरातील तिजोरी फोडून त्यात ठेवलेले दिड तोळ्याचे घंटन,एक तोळ्याची बोरमाळ,चार ग्रामची अंगठी, दिडशे ग्रामची चांदी, छत्तीस हजार रोख रक्कम व दोन साड्या चोरट्यांनी लंपास केले आहे.

 

 

त्यांच्या शेजारील तुकाराम बापू कोडग यांच्या खिडकीत ठेवलेल्या पॉकेट मधून बाराशे रुपये पळविले.तसेच शेजारील सीताराम बळवंत कोडग यांच्या घरातील कपडे नेऊन मळ्यात विस्कटून फेकून दिले आहेत.गावातील रुक्मिणी अण्णासो कोडग यांच्या घरातील एक तोळ्याची बोरमाळ चोरून नेली आहे.

 

 

त्याच्या शेजारील गणपती मारुती केदार यांच्या घरात अडकवलेल्या शर्ट च्या खिशातून आठशे रुपये चोरट्यांनी पळविले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री.डुबल यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.अधिक तपास हवलदार माने करत आहेत
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here