भिवर्गीचे पोलीस पाटील श्रीशैल चौगुले तालुकाध्यक्ष

0
भिवर्गी, संकेत टाइम्स : उमदी पोलीस ठाणे अतर्गंत येणाऱ्या पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी भिवर्गीचे पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांची निवड करण्यात आली.

 

 

पोलीस पाटील सेवाभावी फांऊडेशनचे अध्यक्ष राजकुमार यादव,जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील,प्रभाकर कांबळे,उमदीचे सा.पो.नि.पंकज पवार,उपनिरिक्षक श्री.शिंदे यांच्याहस्ते चौगुले यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 

 

 

ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांचे प्रश्न सोडविण्याबरोबर गावागावात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून माझा प्रयत्न असेल,असे चौगुले निवडीनंतर म्हणाले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.