चोरीस गेेलेले तीन तोळे दागिण्यासह चोरटी महिला पकडली | जत पोलीसांची कामगिरी

0
जत : जत पोलिस यांच्यामुळे उमराणी येथील काशीबाई धोंडमनी यांचे तीन तोळे सोने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली.या घटनेचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झालेल्या चोरट्याला २४ तासाच्या आत चोरट्याला पकडत चोरीस गेलेले तीन हजार रुपये व तीन तोळयाच्या सोन्याचे दागिने मिळवून दिले.

 

 

 

अधिक माहिती अशी की, उमराणी येथील काशीबाई धोंडमनी या बुधवारी जत येथील एका सराफ दुकानात पैंजण खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.त्यानी पैंजण खरेदी करून पर्समध्ये ठेवले त्या अगोदरचे तीन तोळ्याचे दागिणे होते.त्या बाजारातून जात असताना त्यांची पर्स चोरीस गेली. त्यांनी चोरीस गेलेल्या पर्सची शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही.त्यांनी जत पोलीसात धाव घेतली.

 

 

पोलीसांनी तात्काळ घटनेचे गांर्भिर्य ओळखून तपास केला.शहरातील सीसीटिव्हीतील चित्रणाची पाहणी केली.त्यात एका महिलेने पर्स लांबविल्याचे दिसून आले.त्यानुसार पोलीस कर्मचारी विजय कोळेकर,मोहन गावंड यांनी तपास करत पर्ससह महिलेला ताब्यात घेतले.

 

 

दरम्यान उमराणीतील महिला काशिबाई धोंडमनी यांचीच पर्स आहे का यांची खातरजमा करून पर्समधील रोख तीन हजार,तीन तोळे सोने,चांदीचे परत केले.दरम्यान काशिबाई धोंडमनी यांनी पोलीसांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.