क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दुर्लक्षित ; वंसत‌ भोसले

0
जत : जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी सशस्त्र करण्याची परंपरा मोठी आहे.क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण यांनी त्याची सुरुवात मुंबई प्रांताच्या सीमेवर सर्वप्रथमं केली. मात्र त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला इतिहासाने न्याय दिला नाही. त्यांच्या योगदानाकडे आजही दुर्लक्ष होत आहे, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी सिंदूर (ता. जत) येथे केले.

 

राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी प्रतिष्ठान आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त मिरज ते शहीद भूमी बिळगी (जि. बागलकोट) आणि बिळगी ते जन्मभूमी सिंदूर अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. तिचा समारोप गुरुवारी भोसले यांच्या उपस्थितीत झाला.त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवादलाचे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम होते.

 

दुष्काळाच्या कलंका बरोबरच जत तालुक्यातील हुत्मात्मे, क्रांतिकारक हेही उपेक्षित राहिले आहेत. सिंदुर लक्ष्मण क्रांतिकारक हे सुध्दा जिल्ह्याला नव्हेतर जत तालुक्याला नाव माहीत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे परखड मत दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक वसंत भोसले यांनी केले.
भोसले म्हणाले की, नागनाथ अण्णा नायकवडी पासून ते अनेक क्रांतिकारक व हुतात्मे जिल्ह्याला लाभले होते. मात्र त्यांची आठवण फक्त जयंती दिनी होते. त्यांचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा, तसेच त्यांच्या इतिहासाची माहिती घेऊन लेखन स्वरूपात साहित्य लीहले पाहिजे, सिंदूर गावाला सिंदूर लक्ष्मण हे नाव द्यावे. तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

जत तालुका खराच सर्वच बाबतीत उपेक्षित राहिला आहे. मी जिल्ह्याचा १९७२ चा दुष्काळ पाहिला आहे. त्यावेळी पाण्या अभावी गावेच्या गावे ओस पडत होती. आत्ता परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी कांहीं ठिकाणीं आले आहे. शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय याचबरोबर नवीन तंत्र्यनान अवगत करून ज्या पिकाला चांगले दर आहेत ते पीक घेऊन शेतकऱ्यांनी आपला विकास साधावा, असे आवाहन केले.

 

Rate Card

सिंदूर येथील अभिवादन कार्यक्र मास स्वागताध्यक्ष बी. आर. पाटील (सिंदूर) यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती अँड. सी.आर.सांगलीकर, लक्ष्मण नाईक (क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांचे पणतू), भाई व्ही. वाय. (आबा) पाटील, कॉ. धनाजी गुरव, अँड. के. डी. शिंदे, संगापाअण्णा पाटोळे, प्रा.दादासाहेब ढेरे,प्रा.वासुदेव गुरव, प्रा. गौतम काटकर, डॉ. रामचंद्र शांत, बाबासाहेब नदाफ, साथी विकास मगदूम,दिनकर आदाटे, रमेश हेगाणे, लक्ष्मण चव्हाण,कॉ. मारुती शिरतोडे, बाळासाहेब पाटील, नितीन चंदनशिवे, सुरेंद्र सरनाईक, रोहित शिंदे, भगवान सोनंद, मानसिंग सोरटे, सागर माळी, शिवानंद हिप्परगी, सतिश शेरबंदे, दिपक कोठावळे, दिग्विजय पाटील, राहुल कांबळे, दिनराज वाघमारे, मच्छिंद्र ऐनापुरे उपस्थित होते.
माझे शिक्षण बेळगाव येथे दहावी पर्यंत मराठी भाषेत झाले. मला कन्नड बोलता येते मात्र लिहिता- वाचता येत नाही. लहानपणी सिंदुर लक्ष्मण यांची नाटके व चित्रपट पाहिली मात्र त्यांचा इतिहास पत्रकार क्षेत्रात असूनही मला अनुभवायला मिळाला नाही, असे भोसले यांनी आपल्या भाषणात म्हणाले.
सिंदूर येथे क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त मिरज ते शहीद भूमी बिळगी (जि.बागलकोट) आणि बिळगी ते जन्मभूमी सिंदूर अशी सायकल रॅलीचा समारोप करताना वसंत भोसले,अँड.सी.आर.सांगलीकर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.