धक्कादायक | चुलत दिराने आईसह दोन चिमुकल्यांचा खून करून जाळले

0

 

एक धक्कादायक घटना आदर्श शहर असलेल्या पुण्यातून समोर आले असून चुलत दिराने आईसह दोन चिमुकल्याचा खून करून त्यांचे मृत्तदेह झाल्याचा प्रकार समोर आला आहे.बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

जतेतील तो खून नव्हे,डायव्हरचा अतिमद्य प्राशनाने मृत्यू

चारित्र्याच्या संशयावरून चुलत दिरानेच दोन चिमुकल्यासह त्यांच्या आईचा निर्घृण खून केला आणि त्यानंतर त्यांना घरात जाळून टाकले.हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे.याप्रकरणातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

 

खून झालेल्यामधिल आईचे आम्रपाली वाघमारे (वय 30) तर रोशनी (वय 6) आणि 4 अशी चिमूकल्याची नावे आहेत. संशयित आरोपी दिर वैभव वाघमारे याला पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. बुधवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली आहे

रस्त्याचा वाद विकोपाला,काकाचा पुतण्याने केला धारदार शस्ञाने खून | बेंळकीतील घटना

Rate Card

याप्रकरणी पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,संशयित आरोपी वैभव आणि आम्रपाली हे मूळचे पुण्याबाहेरील आहेत.संशयित आरोपी वैभव हा आम्रपाली हिचा चुलत दीर आहे.आम्रपाली ही विवाहित होती.तरीही चुलत दिर वैभव या दोघात प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही घरातून पुणे शहरात पळून आले होते. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी येथे ते एका भाड्याच्या घरात राहत होते.दरम्यान आम्रपालीच्या चारित्र्यावर आरोपी वैभव सतत संशय घेत होता. त्यातूनच भयानक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

दरम्यान बुधवारी मध्यरात्री या दोघात या कारणावरून जोराचा वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संशयित आरोपी वैभवने आम्रपाली हिचा खून केला. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या चिमुकल्यांनी ते रडत असताना आरोपीने त्यांनाही ठार मारले. त्यानंतर तिघाचे मृत अवस्थेतील मृत्तदेह त्याने घरातच जाळले.

दुसऱ्यांदा मुलगीच झाल्याने विहिरीत ढकलून पत्नीचा खून,निर्दयी पतीला अटक

त्यानंतर संशयित आरोपी वैभव पसार झाला होता.घटनेची माहिती मिळताचं कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पळून गेलेला संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.पोलीस अधिक तपास करत आहेत.या घटनेने पुणे शहर हादरले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.