कंगनाला सरकारने आता कोणता पुरस्कार द्यायला हवा

0
Rate Card
                                               
देशातील बेजबाबदार व्यक्तींवर, बेजबाबदार राजकीय पुढाऱ्यांवर व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर केव्हा होणार कठोर कारवाई? कारण देशात असे हजारो ज्वलंत मुद्दे आहेत की त्यावर लोकांची रोजीरोटी व जिवनमरनाचा प्रश्न अवलंबून आहे.परंतु देशातील ज्वलंत मुद्यांना डावलून व लोकांना भ्रमीत करण्यासाठी संपूर्ण राजकीय पक्ष आमजनतेची दिशाभूल करतांना दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे कंगना. कंगना रनौट, आर्यन खान,समिर वानखेडे, परमबीर सिंग,रिया चक्रवती, बॅंक घोटाळ्यातील भगोडे याच्यावर कारवाई कमी परंतु मिडिया समोर तमाशा जास्त दिसून येतो.सर्वसाधारण व्यक्तीने छोटासाही गुन्हा केला तर त्याच्यावर ताबडतोब कठोर कारवाई होते.मागील वर्षापासुन कंगनाने विवादास्पद वक्तव्याची मालीका सुरू करून मिडिया समोर आपली प्रसिद्धीची पकड मजबूत केली आहे.

 

कधी मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देने, कधी स्वातंत्र्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करने आणि आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करून देशातील जनतेला भ्रमीत करून प्रसिद्धी मिळावीण्याकरीता हा लपंडाव सुरू आहे.यापुढेही कंगनाकडुन  विदास्पद बयानबाजी सुरूच रहाण्याची चिन्हे पुन्हा दिसत आहेत.केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.कारण आतातर कंगनाने संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते.कारण महात्मा गांधीजींच्या अहिंसेची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली आहे.महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही.शिवाय दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही, अशी खोचड टीका कंगनाने गांधींजींवर केली आहे.

 

तरीही सरकार डोळे,कान आणि तोंड बंद करून पहात आहे.त्यामुळे जनतेला प्रश्न आहे की  कंगनाबद्दल सरकारचे मौन धारण का? सध्याच्या परिस्थितीत कंगनाचा विवादीत बयानबाजी देण्याचा धंदा बनल्याचे दिसून येते.कारण चित्रपटात तीला आता जागा मिळते कठीण झाले आहे.नुकतेच कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधींवर सवाल उचलतांना म्हटले की महात्मा गांधीने ना भगतसिंग यांचे सर्थन केले ना सुभाषचंद्र बोस यांचे समर्थन केले.असे अनेक विवादास्पद बयान देण्याचा जनुकाय सपाटा लावला की काय असे वाटत आहे.परंतु सरकारी सुत्रांकडून कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई होतांना दिसत नाही याचे दू:ख १३५ कोटी जनतेला आहे.काही महीने अगोदर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असे संबोधले होते तेव्हाही देशात मोठा विवाद निर्माण झाला होता.सुशांतसिंग राजपूत केसमध्ये सुध्दा कंगनाने इंट्री केली तीथेही विवादास्पद वक्तव्य दिले होते.

 

अशा विवादास्पद महिलेला सरकार कशे काय पद्मश्री पुरस्काराने सन्माननीत केले यातही शंकाच निर्माण होते. कंगना बद्दल सरकार डोळ्यावर पट्टी बांधून का? कंगनाचे एकामागून एक देश विरोधी वक्तव्य येत आहे.परंतु केंद्र सरकार पुर्णपणे चुप्पी साधून आहे.सरकार स्वातंत्र्याची परीभाषा काय असते हे आता सरकारनेच सांगावे.महात्मा गांधी ही व्यक्ती नसून विचार आहे आणि हा विचार जगाने स्विकारला आहे.आइन्सटाईन सारख्या शास्त्राज्ञानेसुध्दा गांधीजींच्या विचारांची तुलना देवाशी केली आहे.परंतु कंगना शहिदांचा व स्वतंत्र भारताचा घोर अपमान करीत आहेत.केंद्र सरकारने जाहीरपने सांगावे की खरे स्वातंत्र्य केव्हा मिळाले. सध्याच्या परिस्थितीत कंगनाच्या विधानावरून 135 कोटी जनता भ्रमीत व दु:खी आहे.त्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने सामोरं येवून अधिकृतरित्या सांगावे की भारत केंव्हा स्वतंत्र झाला.कारण कंगनाला पुरस्काराची गरज नसुन मानसिक उपचाराची जास्त गरज आहे.कंगनाजी 1947 मध्ये युद्ध झाले नव्हते. परंतु भारत स्वतंत्र झाला होता.

 

भारत स्वातंत्र्यासाठी एक दिवसाचे किंवा एक वर्षाचे युद्ध लढल्या गेले नसुन.15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडायला तब्बल 150 वर्षे लागलीत म्हणजे 54787 दिवस लागले.त्यामुळे कंगनाने लक्षात ठेवायला पाहिजे की 2014 मध्ये कोणते युद्ध झाले आणि कोणासोबत झाले हे 135 कोटी जनतेला समजून सांगायला पाहिजे आणि कंगनाने या युध्दात कीती बलीदान दिले हे सुद्धा समजून सांगण्याची गरज आहे.2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले यामुळे देश-विदेशात भारताची पकड मजबूत झाली यात दुमत नाही.परंतु 2014 मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले ही बाब हास्यास्पद, घृणास्पद,निंदनीय आहे व स्वातंत्र्यवीरांना व शहिदांना धक्का देनारी आहे.सध्याच्या परिस्थितीत आपण काय बोलत आहे याचेसुध्दा भान कंगनाला नसल्याचे दिसून येते.

 

जनुकाय ती नशेत आहे की काय असे वाटत आहे.जर 2014 ला खरे स्वातंत्र्य मिळाले असते तर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमृतमहोत्सवाची घोषणाच केली नसती.यावरून असेही म्हणता येईल की कंगनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सुध्दा अपमान केल्याचे दिसून येते.कंगनाने माननीय प्रधानमंत्री यांना विचारावे की आपण खरोखरच अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत की अमृतमहोत्सवाला आणखी वेळ आहे याची सहनीशा इतिहासकार,बुध्दीजीवी, जानकार, संपूर्ण वरीष्ठ राजकीय पुढारी व माजी सैनिक यांच्याशी सल्लामसलत करण्याची कंगनाला नितांत गरज आहे.कारण कोणता व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाचा आहे याच्याशी आम्हाला व देशांच्या 135 कोटी जनतेला काही देणे घेणे नाही.

 

परंतु कंगनाने मिडीयामध्ये प्रसिद्धी मिळावी यासाठी मुद्दाम वाद जास्तच चीघळवीला आहे व चीघळवीत आहे.त्यामुळे सरकार मार्फत अधिकृतरित्या 135 कोटी जनतेला समजून सांगायला पाहिजे की भारत 1857 किंवा 1947 किंवा 2014 मध्ये स्वतंत्र झाला. कारण वाकयुध्दात संपूर्ण राजकीय पुढारी आप-आपली पोळी शेकत आहे ही बाब 135 कोटी जनतेला चांगल्याप्रकारे ग्यात आहे. परंतु गेल्या 100 वर्षापासुन जे पुस्कात लिहिले आहे ते किंवा स्वातंत्र्यानंतर जी शैक्षणिक पुस्तके शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयात निघाली त्या पुस्तकातील इतिहास खोटा आहे काय?कारण गेल्या 74 वर्षात अनेक वेगवेगळ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले.आजच्या परिस्थितीत काही विपक्षात आहेत तर काही पक्षात आहे.परंतु त्या पुस्तकांचा कोणीच विरोध केला नाही.परंतु कंगनाने कोणत्या शाळेत प्रवेश घेतला होता त्या शाळेतील इतिहासाची पुस्तके वेगळी होती काय? असे अनेक प्रश्न कंगनाच्या वक्तव्यावरून निर्माण होतात.याची संपूर्ण चौकशी होण्याची गरज आहे.कारण कंगना सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नाही.परंतु राजकीय खेळी ती अवश्य खेळत असावी असे वाटते.

 

कंगनाचे वय 34 वर्षे आता अचानक 1857 चा स्वातंत्र्याचा पहिला सामुहिक लढा होता हे कसे काय आठवले! पहीले सांगायचे की 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती आणि 2014 ला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आणि आता सांगत आहे की महात्मा गांधींना सत्तेची भुक होती.यापुढे पुन्हा काहीही वक्तव्य करू शकते. कारण तीला काहीही बोलण्याचा अधिकार असल्याचे दिसून येते.कंगना रनौट 2014 च्या आधी पारतंत्र्यात होती का? देशात कॉंग्रेस विरोधातील अनेक सरकार स्थापन झालीत , मोरारजी देसाई,व्ही.पी.सिंग,चनसिंग,देविगौडा, इंद्रकुमार गुजराल, 1999 ते 2003 माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचीही सरकार  2014 च्या आधी होती.तेव्हा कंगना पारतंत्र्यात होती काय? ती जर पारतंत्र्यात होती तर तीने चित्रपट सृष्टीत पाय कसे काय ठेवले? चित्रपट काढण्याकरीता पुर्ण स्वतंत्र कोणी दिले?असे अनेक प्रश्न कंगनाच्या निर्थक विधानावरून उपस्थित होतात.2014 च्या आधी पारतंत्र्यात असतांना स्वातंत्र्यासाठी कीती त्रास सहन करावे लागले याचाही हीशोब कंगनाने सरकारला,135 कोटी जनतेला, हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना देण्याची गरज आहे.जीभेचे वजन खूप कमी असते,

 

 

परंतु तीचा तोल सांभाळण खुप कमी लोकांना जमत त्यातलीच ही कंगना आहे.परंतु कंगनाचे आता असे झाले आहे की “उचल्ली जीभ लावली टाळ्याला” त्यामुळे तीच्या जीभेला हाडच नसल्याचे दिसून येते.आता सरकारला ठरवायचे आहे की कंगना खरी की, इतिहास खरा की,135 कोटी जनतेने पहाले किंवा वाचले ते खरे.आपला देश अमृतमहोत्सव साजरा करीत आहे.त्यामुळे देशात सरकारने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.करीता सरकारने अधिकृतरित्या सांगावे की भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला की 2014 मध्ये स्वतंत्र झाला.कारण विक्रम गोखले सारखे अनेक दिग्गज कंगनाच्या समर्थनार्थ सरसावले आहे.त्यामुळे स्वातंत्र्याचीबाब ही अर्धसत्य न रहाता सत्य सामोरं यायला पाहिजे.जर सरकार अधिकृतरित्या सांगत असेल की भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला.तर ताबडतोब सरकारने वेळ न करता कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करून आजन्म कारावासात टाकायला पाहिजे.कारण कंगनाने 135 कोटी जनतेची दिशाभूल केली आहे.

 

 

त्यामुळे सरकारने कंगनाच्या वक्तव्यावर ताबडतोब पडदा टाकायला पाहिजे.कारण सरकार कंगना बद्दल ठोस निर्णय न घेत असल्यामुळे लोकांमध्ये असमनजस्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकवेळा लोकांना माहिती होवू द्या की खरं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 की 1857 की 2014 याचा खुलासा होने गरजेचे आहे.पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पद्यश्री पुरस्काराची सुरूवात 1954 पासून करण्यात आली.मग हा पुरस्कार पारतंत्र्यातला की स्वातंत्र्यातला हे सुद्धा कंगनाने सांगावे आणि 2021 ला कंगनाला मिळालेला पद्मश्री पुरस्कार पारतंत्र्यातील की स्वातंत्र्यातील याचेही स्पष्टीकरण कंगनाने जनतेला देने गरजेचे आहे.महात्मा गांधीजीं बद्दल बोलताना कंगनाने जीभ आवरायला पाहिजे.कारण  4 जुन 1944 ला सिंगापूर रेडिओ वरुन एक संदेश देतांना सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणुन संबोधीत केले तेव्हापासून महात्मा गांधींना राष्ट्रपिता महात्मा गांधी संबोधल्या जावु लागले.म्हणजेच महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे संबंध चांगले आणि मजबूत होते.

 

रमेश कृष्णराव लांजेवार                                     
नागपूर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.