जिल्हा बँक ; जतेत प्रचार रंगतदार | दोन्ही बाजूने विजयाचे‌ दावे 

0

जत : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रचाराची आज सांगता होणार आहे. या निवडणुकीत सर्व पक्षीय नेत्यांनी ‘हातात-हात’ घातल्याने म्हणावा तसा राजकीय रंग रंगला नाही. मात्र जिल्ह्यावरील राजकीय हुकूमत अबाधित ठेवण्यासाठी, बँकेची सत्ता काबिज करण्यासाठी नेतेमंडळींनी गुप्त बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याबाबतची उत्सुकता आहे.

 

 

जत तालुक्यातील उमेदवारांचा प्रचार अगदी टोकाला पोहचला असून सोसायटी गटातून आमदार विक्रमसिंह सांवत व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे तर ओबीसी प्रवर्गातून  पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब व जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांच्यात थेट लढत होत आहे.दोन्ही बाजूने विजयाचा दावा गेला जात आहे.

 

 

महाविकास आघाडीचे कॉग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग,राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,तालुकाध्यक्ष रमेशराव पाटील ‌हे कष्ट घेत आहेत.तर भाजपाकडून माजी आमदार विलासराव जगताप, तालुकाध्यक्ष सुनिल पवार,अँड.प्रभाकर जाधव व पदाधिकारी आदी कष्ट घेत आहेत.दोन्ही पँनेलच्या उमेदवारांनी आपले समर्थक मतदारासह सहलीवर पाठविले आहे. अनेकांची दोन्ही बाजूने मनधरणी सुरू आहे.आज व उद्या दोन्ही पँनेलच्या नेत्यासह,उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

 

आ.सांवत व जमदाडे तुल्यबळ लढत

अगदी अनपेक्षित पणे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये‌ प्रवेश केलेले माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी भाजपाच्या पँनेलमधून आमदार विक्रमसिंह सांवत यांना तुल्यबळ आवाहन दिल्याने सोसायटी गटातील ही लढत चुरशीची झाली आहे.दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.