जिल्हा बँकेत ८५.३१ टक्के चुरसीने मतदान | या गटात धक्कादायक निकालाची शक्यता | १८ संचालक मंगळवारी ठरणार

0

जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूकीत जत तालुक्यात मोठ्या चुरसीने ८५.७१ टक्के मतदान झाले.तालुक्यातील सोसायटी गट ८५ तर इतर गटातील १०४ अशा १८९ मतदाना पैंकी सोसायटी ८५ व इतर गटातील ७७ असे १६२ मतदान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.जत तालुक्यात चार उमेदवार रिंगणात आहेत.त्यात आमदार विक्रमसिंह सांवत विरुध माजी सभापती प्रकाश जमदाडे तर माजी सभापती मन्सूर खतीब विरूध माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील अशी चुरसीची लढत झाली.अंत्यत टोकाचा प्रचार झालेल्या या निवडणूकीसाठी जत शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नं.३ मध्ये या एकाच मतदान केंद्रावर शांतेत मतदान झाले.

 

 

 

 

माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या बंडामुळे हायहोल्टेज लढतीचे सोसायटी अ गटातील मतदान अंत्यत टोकाचे झाले. या गटातील ८५ पैंकी ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.कॉग्रेसने सहलीवर पाठविलेले त्यांचे मतदार आराम बसने आणत एकाचवेळी मतदान केले.राष्ट्रवादीकडूनही त्यांच्या मतदारांना वेगळे आणत मतदान करून घेतले.भाजपाकडून त्यांच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणत मतदान करून घेतले.

 

 

 

अंत्यत अटातटीने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या समर्थक मतदारांना अगदी सुरक्षित मतदान केंद्राजवळ आणले.दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमले होते.यात महाविकास आघाडीचे उमेदवार आ.विक्रमसिंह सावंत,मन्सूर खतीब,तर भाजपाचे प्रकाश जमदाडे,तम्मणगौडा रवीपाटील यांनी सकाळपासून नियोजन केले होते.

Rate Card

 

 

 

तर कॉग्रेसकडून माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,सरदार पाटील तर भाजपा कडून माजी आमदार विलासराव जगताप, तालुकाध्यक्ष सुनिल पवार, उमेश सांवत आदी नेत्यांनी कष्ठ घेतले.
शेवटच्या क्षणापर्यत संघर्ष पुर्ण ठरलेल्या या निवडणूकीत कोन बाजी मारणार हे उद्या दुपारी पर्यत स्पष्ट होणार आहे.दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला आहे.
दरम्यान अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या बँकेच्या निवडणुकीसाठी 85.31 टक्के मतदान झाले.गेल्या निवडणुकीत बँकेसाठी तब्बल 95 टक्के मतदान झाले होते. यावेळी दहा टक्के मतदान कमी झाले आहे.सकाळी आठ ते पाच या वेळेत जिल्ह्यात मतदान पार पडले. विकास महाआघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत झाली असून 23 रोजी मिरजेत मतमोजणी होणार आहे.

 

 

 

विकास महाआघाडीच्या तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 18 जागापैकी पाच ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा केला जात असून निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान सर्वात जास्त आटपाडीत ९९ टक्के असे सर्वाधिक तर सांगलीमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

जतेत करेक्ट कार्यक्रमाची चर्चा
जिल्हा बँकेच्या या‌ निवडणूकीत जत तालुक्यात हायहोल्टेज सामना रंगला होता.आमदार विक्रमसिंह सांवत, विरूध ‌माजी सभापती प्रकाश जमदाडे असा टोकाचा सामना झाला आहे. येथे दोन्ही बाजूने करेक्ट कार्यक्रमाचा दावा केला जात आहे. त्यामुळे कोणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला हे मंगळवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
१२ केंद्रावर शांततेत मतदान
जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या या निवडणूकीत जिल्ह्यात १२ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील सर्व गटातील २५७३ मतदारापैंकी २१९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावली ही टक्केवारी ८५.३१ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.