नाशिक – दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ भिषण अपघात झाला आहे. बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
ढकांबे गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज अपघात झाला आहे. दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.