प्रकाश जमदाडे विजयी | जतेत काटा लढतीत धक्कादायक निकाल ; माजी आमदार विलासराव जगताप पुन्हा किंगमेकर

0

 

जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा बँक निवडणूकीत जतेत झालेल्या आमदार विक्रमसिंह सांवत व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्यातील काटा लढतीत अखेर प्रकाश जमदाडे यांनी बाजी मारली असून त्यांना ४५ मते पडली आहेत.

 

 

 

तर आ.सांवत यांना ३८ मते पडली.जमदाडे ७ मतांनी विजयी झाले आहेत.अर्ज भरण्यापासून संघर्ष पुर्ण झालेल्या जिल्हा बँकेच्या जतेतील अ गटातील निवडणूकीत अखेर विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांना झटका बसला असून राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनाही हा धक्का समजला जात आहे.जमदाडे यांच्या विजयामुळे जत तालुक्याचे यापुढे राजकारण बदलणार हे निश्चित आहे.

 

 

या विजयामागे भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांची मोठी भूमिका राहिली आहे.त्यांनी निवडणूकी आधीच आ.सांवत यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार मोठी गोळा बेरीज करत माजी आमदार जगताप यांनी जमदाडे यांना निवडून आणण्याची किमया साधली आहे.पुन्हा किंगमेकर असल्याचे सिध्द केले आहे.

 

 

*जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक*
🛑मिरज सोसायटी गट🛑
*विशाल दादा पाटील (आघाडी) ५२ विजयी*
उमेश पाटील (भाजप) १६

🛑आटपाडी सोसायटी गट🛑
*तानाजी पाटील (आघाडी) ४० विजयी*
राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) २९

🛑कडेगांव सोसायटी गट🛑
*मोहनराव कदम (आघाडी) ५३ विजयी*
तुकाराम शिंदे (भाजप) ११

Rate Card

🛑तासगाव सोसायटी गट🛑
*बी. एस. पाटील (आघाडी) ४१ विजयी*
सुनील जाधव (भाजप) २३
ऍड. प्रताप पाटील (अपक्ष) १५

🛑वाळवा सोसायटी गट🛑
*दिलीप तात्या पाटील (आघाडी) १०८ विजयी*
भानुदास मोटे (भाजप) २३

🛑कवठेमंकाळ सोसायटी गट🛑
*अजितराव घोरपडे (आघाडी) ५४ विजयी*
विठ्ठल पाटील (अपक्ष) १४

🛑जत सोसायटी गट🛑
*प्रकाश जमदाडे (भाजप) ४५ विजयी*
विक्रमसिंह सावंत (आघाडी) ३८

🛑 महिला राखीव गट🛑
*अ जयश्रीताई पाटील (आघाडी) १६८८ विजयी*
*ब अनिता सगरे (आघाडी) १४०८ विजयी*
संगीता खोत (भाजप) ५७९
दिपाली पाटील (भाजप) ४०५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.