सांगली जिल्हा बँकेत‌ पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता‌ | जतेत धक्कादायक निकाल | राष्ट्रवादी ९,कॉग्रेस ५,भाजपा ४,शिवसेना ३

0
Post Views : 2,263 views
सांगली : प्रचंड रंगतदार झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.राष्ट्रवादीला सर्वाधिक ९, काँग्रेस ५ , भाजप ४, शिवसेना ३ असा निकाल लागला.

 

 

सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकल्या आहे,कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीकडून करेक्ट कार्यक्रम केला आहे.

 

 

यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत.आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक ९ , काँग्रेस ५ , भाजप ४, शिवसेना ३ असे उमेदवार निवडून आले आहेत.

 

 

सोसायटी गटातून वाळवा तालुक्यातील विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील विजयी झाले, हाय व्होल्टेज ठरलेल्या आटपाडीत शिवसेनेचे तानाजी पाटील यांची बाजी मारली, येथे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव झाला. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली, तासगावमध्ये राष्ट्रवादीचे बी.एस.पाटील विजयी झाले आहेत. कडेगावमधून आमदार मोहनराव कदम पुन्हा विजयी झाले आहेत.

 

 

तर‌ जतमधून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सांवत यांचा पराभव करत प्रकाश जमदाडे विजयी झाले आहेत.सोसायटी गटात महाविकास आघाडीचेच वर्चस्व दिसून आले आहे.
महिला राखीव गटातून काँग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील, राष्ट्रवादीच्या श्रीमती अनिता सगरे यांचा मोठा विजय झाला.इतर मागास प्रवर्गातून काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांचा सलग दुसऱ्यांदा विजयी झाले,इतर मागास प्रवर्गातून राष्ट्रवादी कॉग्रेसचे मन्सूर खतीब यांनीही बाजी मारली आहे.

 

 

पतसंस्था गटातून कॉंग्रेचे पृथ्वीराज देशमुख, तर भाजपचे राहुल महाडिक विजयी झाले. प्रक्रिया गटातून दिवंगत आर.आर.पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, इतर संस्था गटातून राष्ट्रवादीचे वैभव पाटील विजयी झाले. मजूर संस्था गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि सत्यजित देखमुख विजयी झाले.

 

 

जतेत सत्तासंघर्षाचा नवा अध्याय
जत तालुक्यात भाजपा व कॉग्रेसमध्ये सातत्याने द्वंद सुरू असते.जिल्हा बँक निवडणूकीत ते आणखीन प्रखर झाले.भाजपाचे सोसायटी गटाचे उमेदवार पवार यांचा अर्ज छाणणीत उडविल्यानंतर संघर्ष टोकाचा बनला.भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते प्रकाश जमदाडे यांना भाजपाकडे खेचत आमदार विक्रमसिंह सांवत यांच्यासमोर तगडे आवाहन उभे केले होते.यात राष्ट्रवादी कॉग्रेसचाही हातभार‌ लागल्याने विजयाचा दावा करणारे आमदार विक्रमसिंह सांवत ७ मतांनी पराभूत झाले.या निवडणूकीनंतर जत तालुक्यातील सत्ता संघर्षाचा नविन अध्याय सुरू झाला आहे.
Rate Card

 

आमदारांनी राजीनामा द्यावा ; विलासराव जगताप
विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या एकाधिकार शाहीला जनता कंटाळली आहे.गतवेळी कर्मचाऱ्यांच्या आठवड्यात चार-चार वेळ बदल्या केल्या.शेतकऱ्यांची कर्ज अडवली.या नाराजीमुळे त्यांचा पराभव झाला आहे. आमदारकी त्यांच्या डोक्यात गेल्याने जनमत ढासळत आहे.पराभव स्विकारून त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे.

 

 

राष्ट्रवादीकडून दगा ; कॉग्रेस
कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या पराभवाला राष्ट्रवादी कॉग्रेस जबाबदार आहे.आम्ही आघाडी धर्म पाळला मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसने आम्हाला दगा दिला आहे. येत्या निवडणूकीत सर्व हिशोब होईलचं.मात्र पालकमंत्री जयंत पाटील यांचाही शंब्द तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळला ‌नसल्याचे कॉग्रेस नेत्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
विजयी उमेदवार
१)विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट
२)आ.मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट
३)महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)
४)जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट
५)अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट
६)दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट
७)आ.मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)
८)बी एस पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट
९)प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट
१०)तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट
११)आ.अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)
१२)अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट
१३)वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट
१४)मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट
१५)बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट
१६)राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती
१७)सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट
१८)पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था
१९)राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था
२०)संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट
२१)सत्यजित देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.