गुगवाड ग्रामपंचायत सदस्या रत्नव्वा अंदानी यांचा कॉग्रेसमध्ये प्रवेश

0
गुगवाड,संकेत टाइम्स : गुगवाड ता.जत येथील भाजपाच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.रत्नव्वा गिरमल्ला अंदानी यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

गेल्या अनेक दिवसापासून गावातील पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याने व कॉंग्रेस प्रणीत पँनेलचे धोरण विकासात्मक असल्याने मी कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे रत्नव्वा अंदानी यांनी सांगितले.
कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,मारूती पवार यांनी सौ.अंदानी यांचे स्वागत केले.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Rate Card
नुकतीच गुगवाड ग्रामपंचायतीच्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.त्यात भाजपाचा सदस्य निवडून आला होता.आता कॉग्रेसने विरोधी गटाचा एका सदस्यांला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे.
यावेळी गंगप्पा कोंकणी, गिरमाला अंदानी,
हनमांत कांबळे,चांद मुल्ला, चांद खोजनवडी, चन्नप्पा कोंकणी,

 

 

महादेव पाटील, चन्नप्पा पाटील, रवसाब अथणी, सुखदेव कोंकणी, विठ्ठल कोंकणी, संगप्पा कोंकणी, शिवलिंग कोंकणी, गोपाल यंकची, सत्याप्पा यंकची, अप्पय्या मठपती, चंद्रशेखर हिरेमठ,बसप्पा चौगुले व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
गुगवाड ता.जत येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.रत्नव्वा अंदानी यांना कॉग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.