बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी गुरूवारी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार

0
सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली मार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी गुरूवार, दि. 30 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. ‍ या सेमिनारमध्ये केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) व कृषि विभागातील इतर योजनाविषयी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ हे माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

इच्छुक युवक युवतींनी meet.google.com/pue-iucb-qnu या सेमिनारच्या लिंकवर विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.