वळसंग मध्ये जखमी घुबड पक्षाला दिले जीवनदान

0
वळसंग :  वळसंग ता.जत येथील जिल्हा परिषद शाळा आवारात काल दि. १२ रोजी घुबड पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला.सदर माहिती वनविभागाच्या अधिकारी यांना कळवून पक्षाचे यशस्वी रेस्क्यू करून उपचारासाठी वनविभागाचे अधिकारी वनपाल ढवळे आणि निलेश जैनाळकर यांनी पक्षाला पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वळसंग येथील जिल्हा परिषद शाळा स्थित ग्रामपंचायत आवारात जखमी अवस्थेत घुबड पक्षी आढळून आला. सदर माहिती ग्रामपंचायत स्टाफ मार्फ़त ग्रामसेवक वाघमारे आण्णा, क्लार्क सुभाष कांबळे, अनिल कांबळे, प्राणीमित्र अजित पुजारी, उमीद मुजावर, यांनी वनविभागाचे अधिकारी यांना कळवले, घटनास्थळी विभागाचे अधिकारी ढवळे आणि जैनाळकर यांनी येऊन सदर जखमी अवस्थेत असलेल्या पक्षाला ताब्यात घेऊन उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. एक पक्षाला जीवनदान दिल्याने ग्रामपंचायत स्टाफचे कौतुक होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.