जतेतील कोविड सेंटर चालू करा ; संजय कांबळे

0
जत,संकेत टाइम्स : सद्धस्थितीत जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यामध्ये गंभीर स्वरूपाचे रूग्ण ही आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जत येथिल बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सूरू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे यांनी केली आहे.
    कांबळे म्हणाले की, जत तालुक्यात सद्या २७५ कोरोनाचे रूग्ण असून हे सर्व रूग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. जत तालुक्यात दररोज पन्नास कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने व या बाबतीत प्रशासन काहीच उपाययोजना करताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कांबळे म्हणाले,यापूर्वी कोरोनाचे दुस-या लाटेच्या वेळी जत येथे ग्रामीण रूग्णालयात, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुलामुलींचे शासकिय वस्तीगृहात तसेच डाॅ.आरळी यांच्या हाॅस्पीटल मध्ये, डाॅ. शालीवाहन पटटणशेट्टी हाॅस्पीटल याठिकाणी खाजगी कोविड हाॅस्पीटल सुरू करण्यात आली होती.
   परंतु सद्या जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले असताना व ही रूग्णसंख्या पहाता परत एकदा जत येथे कोविड रूग्णालयाची अवश्यकता असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
     जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. असे असतानाही प्रशासनाने जतमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच जत शहरासह तालुक्यात कोरोना वाढत आहे.
    प्रशासनाने दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी चा आदेश देऊनही या आदेशाची  जत शहरासह तालुक्यात अंमलबजावणी होताना दिसत नाही.सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या कोविड लसीकरण च्या बाबतीत जत तालुक्यात कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. तालुक्यात जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जोमाने कामाला लागावे व जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल याकडे लक्ष द्यावे असेही कांबळे म्हणाले .
     जत शहरासह तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढू लागला आहे. ही धोक्याची घंटा असून प्रशासनाने ताबडतोब जत येथिल बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सूरू करावे अशी मागणी ही कांबळे यांनी केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.