सामान्य लोकाचा आपला माणूस ; संजय कांबळे 

0
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा, केंद्रीय राज्यमंत्री, रिपाइंचे सर्वेसर्वा ना. रामदासजी आठवले यांचा मिळालेला मायेचा, हक्काचा भक्कम आधार, माजी महापौर, रिपाइंचे प्रदेश सचिव विवेकजी कांबळे, रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगगनाथजी ठोकळे यांच्या साथीच्या जोरावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष आयु. संजयजी कांबळे यांची जतच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या समाजकारणात, राजकारणात एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आठवले साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, चळवळीतील तत्वनिष्ठ व्यक्ती, समाजकारण व राजकारणात लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते ते रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजयजी कांबळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा..

 

कुठलेही नेतृत्व हे एका रात्रीत उभा राहत नसते तर त्यासाठी स्वतः चंदनाप्रमाणे झिजून समाजकार्य करावे लागते इतकेच नव्हे तर वेळ प्रसंगी कटू प्रसंगालाही सामोरे जावे लागते. आजच्या या जमान्यात चळवळीसाठी निस्वार्थपणे काम करणारे बोटावर मोजण्याइतकेच आहेत त्यात जत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजयजी कांबळे यांचा नामोल्लेख केल्याशिवाय यादीच पूर्ण होवू शकत नाही.
प्रतिकूल परिस्थीवर मात करत,  दलितांवरच नव्हे तर कुठल्याही समाजावर, चळवळीत काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला की निढरपणे, लढवय्यावृत्तीने काम करणे हा संजयजी कांबळे यांचा गुण. त्यांच्या या गुणांमुळेच जिल्ह्याच्या राजकारणात संजयजी कांबळे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आजच्या सोशल मिडियाच्या जगात क्षणात केलेली कामे क्षणात जनतेपर्यत पोहचतात पण त्याकाळी त्यांनी केलेले कामे सोशल मिडियासारखे माध्यम नसतानाही लोकांच्या चिरकाल लक्षात आहेत हेच त्यांच्या कामाचे, यशाचे खरे गमक होय.

 

विद्यार्थी दशेपासून चळवळीत सहभागी असलेले संजयजी कांबळे यांनी सर्वसामान्यांचे हित, अन्यायाविरुद्ध लढा हे ब्रीद वाक्य मनी धरत कामास सुरुवात केली.१२ डिसेंबर १९८८ साली जत येथे दलित पँथरच्या माध्यमातून संजयजी कांबळे यांनी कामास सुरुवात केली. दलित पँथरचे तत्कालीन नेते, विद्यमान केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या सोबत संजयजी कांबळे यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. आजही त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत संजयजी कांबळे यांचे काम सुरू आहे. दलित पँथरमध्ये आक्रमक नेतृत्व म्हणून संजयजी कांबळे ओळ्खले जात. त्यांच्या या आक्रमकपणामुळे अन्याय करणाऱ्या व्यक्तींची पाचावर धारण बसत तर अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळत असे व आजही त्यांचे कार्य असेच सुरू आहे. समाजकार्यात मग्न असलेल्या संजयजी कांबळे यांनी १९९२ मध्ये जत ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत मतदारांनी नवख्या असलेल्या संजयजी कांबळे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.  तेव्हापासून आजतागत  जनतेच्या जिवावर संजयजी कांबळे यांनी समाजकारण व राजकारणात कधी मागे वळून पाहिले नाही. १९९८ च्या जत ग्रामपंचायत निवडणुकीत ही संजयजी कांबळे हे निवडून आले. इतकेच नव्हे तर त्यांनी उपसरपंचपद ही पटकावले. २००२-०३ दरम्यान संजयजी कांबळे यांची सरपंचपदी निवड झाली होती.

 

■ सरपंच पदाच्या काळात दमदार कार्य
रिपाइंचे पहिले ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच होण्याचा मान पटकावणाऱ्या संजयजी कांबळे यांनी जत ग्रामपंचायतीचे सरपंचपद पटकावीत जतच्या राजकारणात एक नवा इतिहास घडविला. रिपाइंचे पहिले सरपंच होण्याचा बहुमान तर त्यांना मिळालाच त्याचबरोबर जत ग्रामपंचायतीमध्ये पहिले मागासवर्गीय सरपंच म्हणून त्यांची वर्णी लागली.

 

जत ग्रामपंचायतीचे पहिले मागासवर्गीय सरपंच म्हणून संजयजी कांबळे त्या पदावर विराजमान झालेले असले तरी त्यांनी कधीही जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले नाही. सरपंच असताना जतमधील ब्राह्मण गल्लीत पिण्याचे पाणीच पोहचले नव्हते. संजयजी कांबळे यांनी त्या भागात अथक प्रयत्नाने पाणी पोच केले होते. ब्राम्हण गल्लीत पाणी आल्यानंतर तेथील महिला भगिनींनी आपले स्वागत केले होते, सत्कार केला होता हे सांगताना संजयजी कांबळे यांचा आजही ऊर भरून येतो . सरपंच असताना त्यांनी केलेल्या कामाची ही एक पोचपावतीच होय.

 

अवघे तेरा महिन्याच्या सरपंच काळात संजयजी कांबळे यांनी जत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत केला, रस्ते, गटारी, सिमेंट काँक्रीटची कामे मार्गी लावली. त्यावेळी पडलेल्या भयावह दुष्काळात टँकरने पाणी पाण्याच्या टाकीत आणून टाकून चार दिवसाआड जतकराना पाणी पुरवठा केला. १३ महिन्यात दमदार कामगिरी संजयजी कांबळे यांनी करून दाखवली हे सांगताना आम्हाला ही आज अभिमान वाटतो. तरुणाईने आदर्श घ्यावा असे संजयजी कांबळे यांचे कार्य आहे.
■ आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
संजयजी कांबळे यांनी जत ग्रामपंचायतीत अल्प काळात भरीव कार्य केल्याने तत्कालीन पालकमंत्री जयवंत आवळे यांच्या हस्ते त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते.
■ जतच्या राजकारणात साधली हॅंट्रिक
१९९२ ते २००३ या काळात सलग विजयी होत संजयजी कांबळे यांनी विजयाची हॅंट्रिक साधली. या हॅंट्रिकमध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते जतचे सरपंचपद गाठले हे विशेष.
■ सामाजिक कार्यात कायम अग्रेसर
संजयजी कांबळे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज तर उठवलाच त्याचबरोबर सामाजिक कार्यातही स्वतःला झोकुन देत कार्य केले. कोरोनाचा कठीण काळ असो की अन्य कठीण काळ कायम गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहत त्यांना कायम मदतीचा हात दिला आहे. आजही रिपाइंच्या माध्यमातून त्यांचे समाजकारण सुरूच आहे व पुढेही चालूच राहणार आहे.
■  12 डिसेंबर 1988- दलित पँथरच्या माध्यमातून काम
■ 1992- जत ग्रामपंचायत सदस्य
■ 1998- सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीमध्ये विजयी
■ 1998- जत ग्रामपंचायत उपसरपंच
■ 2002- जत ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले
■ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख
■ रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, सांगलीचे रिपाइं जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.