बनाळी येथे पाणंद योजनेअंतर्गत व 25/15 अचकनहळळी ते कोकरे वस्ती रस्ते कामाचा शुभारंभ

0
जत : जत तालुक्यातील बनाळी येथे पाणंद योजनेअंतर्गत व 25/15 अचकनहळळी ते कोकरे वस्ती व रमेश तुकाराम सावंत ते सावंत वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

 

येथील रस्त्यावरून प्रवास करीत असताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचून गेल्याने दिवसाही प्रवास करणे अवघड होऊन बसले होते. लहान मुले, वृद्ध महिला तसेच वृद्धांना रुग्णालयाकडे जाणेसाठी चांगला रस्ता नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

 

सदरचा रस्ता त्वरित व्हावा याबाबत ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना सूचना आमदार सांवत यांनी केल्या.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.