लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी ; बाळासाहेब चव्हाण

0
डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूरचे कॉग्रेसचे जेष्ठ नेते स्वर्गीय सुनिलबापू चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचे आपल्यात नसणे ही मोठी उणीव आहे,असे प्रतिपादन श्री. बुवानंद निधी लि.डफळापूरचे चेअरमन बाळासाहेब चव्हाण यांनी केले.

 

लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेचे पुजन बाळासाहेब चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य देवदास पाटील,माजी ग्रा.प.सदस्य सज्जन हताळे,राहूल बनकर,साहेबराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान चव्हाण यांच्या निवासस्थानी
लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त फुले वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
बापूचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण,हर्षवर्धन चव्हाण यांच्याहस्ते बापूच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करताना बाळासाहेब चव्हाण, बाजूस अभिजीत चव्हाण, देवदास पाटील,सज्जन हताळे आदी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.