चिंचणीच्या मायाक्कादेवीची यात्रा यावर्षी भरणार !

0
चिंचणीच्या मायाक्कादेवीची यात्रा यावर्षी भरणार
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. चिंचणी मायाक्कादेवीची यात्रा दि.१६ ते २० फेब्रुवारी पर्यंत भरणार असून यात्रेकरिता श्री. चिंचणी मायाक्कादेवी मंदिर समितीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री. क्षेत्र चिंचणी येथिल श्री. मायाक्कादेवीची यात्रा दोन वर्षानंतर प्रथमच भरणार असल्याचे समजल्याने श्री.मायाक्कादेवी भक्तांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
कर्नाटक राज्यातील रायबाग तालुक्यातील बेळगाव जिल्ह्यातील श्री. क्षेत्र चिंचणी मायाक्कादेवी चा मोठा महिमा आहे. ही यात्रा महिनाभर सुरू असते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात ऊलाढाल होते त्यामुळे ही यात्रा महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक भक्त व व्यापारी यांना जणू पर्वणीच ठरत आहे.
 या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून लाखो भक्तगण बैलगाड्या, दुचाकी, चारचाकी खासगी वाहनातून येत असतात. यात्रेकरिता पुणे, मुंबई, गोवा येथील मायबायचे भक्त रेल्वेने कानड्या लाडीचे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर गेली वर्षभर क्षेत्र चिंचणी येथिल श्री. मायाक्कादेवी चे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे दर्शनाअभावी अनेक भाविक भक्तांमध्ये मोठी नाराजी दिसून येत होती.
जत येथील श्री. भागम्मादेवी व श्री. मायाक्कादेवी मंदिराचे पुजारी श्री. बसवराज अलगूर महाराज यानी पंधरादिवसापूर्वी श्री. मायाक्कादेवी मंदिर प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालय यांच्याशी संपर्क साधून गेले वर्षभर बंद असलेले श्री. मायाक्कादेवी चे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी प्रयत्न केल्याने श्री. मायाक्कादेवी च्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक येऊ लागले आहेत.
    श्री. मायाक्कादेवीच्या यात्रेकरिता कर्नाटक सरकारने अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. परंतु लाखो भाविक भक्तांच्या आग्रहाखातर कर्नाटक सरकारने या यात्रेसाठी मूक संमती दिली असल्याने ही यात्रा बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ ते रविवार दि.२० फेब्रुवारी २०२२ अखेर भरली जाणार असून दि.२० रोजी रविवारी श्री. मायाक्कादेवी च्या नैवेद्य अर्पण करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे.
या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून लाखो भाविक खासगी वाहनाबरोबरच कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचेवतीने एस.टी.बस ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने एस.टी.चे उत्पन्न वाढणार आहे.
   श्री.मायाक्कादेवी मंदिर समितीने व स्थानिक प्रशासनाने यात्रेकरिता जोरदार तयारी केली असून सर्व भाविक भक्तांना कानड्या लाडीच्या दर्शनाची आस लागली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.