इस्कॉन आरवडेच्या गोशाळेला हवा मायेचा आधार समाजाने यथाशक्ती मदत करण्याची अपेक्षा

0
8
माधवनगर : तासगाव तालूक्यातील आरवडे येथील माळरावाना काही वर्षांपुर्वी इस्कॉनचे अतिशय देखणे कृष्णमंदिर उभे राहिले. आता तर हे मंदिर जिल्ह्यातील अनेक भक्तांचे धार्मिक स्थळ झाले आहे. या मंदिरामध्ये गोशाळा असून सद्या तिथे 40 गायी, 7 बैल आणि 3 वासरे आहेत. मंदिर व्यवस्थापन त्यांची काळजी घेत आहेच, पण आता या गोशाळेला समाजाकडूनही मायेचा आधार आणि यथाशक्ती मदतीची अपेक्षा आहे.
याबाबत माहिती देताना मंदिराचे व्यवस्थापक अभिराम ठाकूर यांनी सांगितले की, ही गोशाळा आरवडे गावाच्या निसर्गरम्य वातावरणात आहे.  सध्या एकूण 40 गायी आहेत- 3 दुभत्या गायी, 7 बैल, 3 वासरे आणि उर्वरित दूध न देणार्‍या गायी आहेत.

 

गायींची काळजी स्थानिक मंदिरातील प्रतिक्षीत भक्त घेतात. गाईंना दररोज गवत, चारा, फळे आणि इतर खाण्यायोग्य पदार्थ दिले जातात. गाईंची स्वच्छताही राखली जाते. देवतांच्या सेवेसाठी याच गाईंचे दुध वापरले जाते. दूध न देणार्‍या गाईंसह इतर गायी, म्हातार्‍या गायींचीही चांगली काळजी घेतली जाते. गोशाळेत सध्या 3 नवजात बछडे आहेत.

 

गाईपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र ही 5 उत्पादने सर्व धार्मिक विधींमध्ये आवश्यक असतात. आरवडेमधी  श्री श्री राधा गोपाल मंदिरामध्ये चालवलेल्या जाणार्‍या या गोशाळेमधील गाई, बैल व वासरांसाठी समाजातील सर्व गोप्रेमींनी आणि जागरुक नागरीकांनी यथाशक्ती मदत करावी. यासाठी कृष्ण किशोर दास (8888841862) किंवा (बलराम कृपा दास 9175234859) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here