सनमडीकर यांच्या रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा ; डॉ.कैलास सनमडीकर 

0
जत,संकेत टाइम्स : जत सीटी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे अत्याधुनिक सोनोग्राफीची सुविधा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली.
या सुविधेचा प्रारंभरेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट म्हणून काम पाहणारे डॉ.रवी जानकर यांच्या आई सुषमा जानकर व वडील बिरा जानकर यांच्या हस्ते करण्यात आला. सोनोग्राफीमध्ये विविध पोट,छातीच्या आजारांचे निदान अचूक कळणार आहे. सांधे, कलर डॉपलर व वेगवेगळ्या प्रकारच्या अँजिओग्राफीचे निदान सापडणार आहे. सिटी व
सोनोग्राफी बायोपस सेवा सुरू केली आहे. याबरोबरच गरोदर मातांच्या सोनोग्राफीची सोय झाली आहे.

 

यासाठी रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट म्हणून डॉ. रवी जानकर हे पूर्णवेळ काम पाहणार आहेत. त्यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. यामुळे सांगली, विजापूर,सोलापूर, पुणे व मुंबई येथे जावे लागत रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट डॉ.रवी जानकर यांच्या आई सुषमा जानकर व वडील बिरा जानकर यांच्या हस्ते अत्याधुनिक सोनोग्राफी सुविधा केंद्राचा प्रारंभ करण्यात आला होते.
आता जतमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने जत तालुक्यातील रुग्णांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.नामांकित फिलिप्स कंपनीची सोनोग्राफी अत्याधुनिक व उच्च तंत्रज्ञान असलेली जगप्रसिद्ध मशीन घेण्यात आली असल्याचे डॉ. सनमडीकर यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.