तुकाराम बाबा महाराज यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान

0

 

 

 

जत, संकेत टाइम्स :चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातील प्रतिष्ठेचा सा. मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आदर्श समाजसेवक पुरस्कार तुकाराम बाबा महाराज यांना जाहीर केला होता.

 

 

राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भारतनाना भालके, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन नंदकुमार पवार, उपनगराध्यक्ष अजित जगताप, मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथ अवताडे, तानाजी खरात, माजी सभापती तानाजी काकडे, संभाजीराव गावकरे, उद्योजक हनुमंत दुधाळ, दत्तात्रय गणपाटील, डॉ . नंदकुमार शिंदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत गणपाटील यांच्या उपस्थितीत तुकाराम बाबा महाराज यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Rate Card

यावेळी बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, तुकाराम बाबा महाराज यांचे कोरोना काळात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. मागील दोन वर्षात हजारो कुटूंबियांना घरपोच जीवनावश्यक किट, भाजीपाला वाटप केला. यात्रा, जत्रेत तसेच जत व मंगळवेढा तालुक्यात हजारो जणांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबा महाराज यांनी सुरू केलेल्या समाजकार्याचे कौतुक केले. येणाऱ्या काळात श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना राज्यभर कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.