आ.विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते दिपक अंकलगी यांचा सत्कार 

0
जत : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे  शासनातर्फे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या समितीवर मुख्य कार्यवाहपदी जत तालुक्यातील येळवी येथील ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी यांची निवड झाल्याबद्दल जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
             यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले,गेली 30 वर्षे सामाजिक कार्यात तन-मन-धनाने प्रामाणिक काम करत असलेले येळवीचे दीपक अंकलगी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील. यासाठी त्यांना लागणारी मदत करू व त्यांच्या पाठीशी राहू. असे आश्वासन यावेळी आमदार सावंत यांनी दिले.
           यावेळी श्रीमंत शार्दूलराजे डफळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,  जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, काँग्रेस कार्याध्यक्ष नाना शिंदे, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, विजय ताड, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष अँड. युवराज निकम, माजी नगरसेवक परशुराम मोरे, शिवसेनेचे अमित दुधाळ, विजयराजे चव्हाण, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे, मारुती पवार, संतोष भोसले यांनीही दीपक अंकलगी यांना शुभेच्छा दिल्या.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.