माडग्याळचे डॉ.सार्थक हिट्टी जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार

0
माडग्याळ, रमेश चौगुले
वैद्यकीय सेवेबरोबर समाजसेवेचा ध्यास घेतलेले माडग्याळचे युवा डॉक्टर सार्थक हिट्टी नव्याने होणाऱ्या माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघासाठी भाजपाकडून प्रमुख दावेदार असल्याचे समोर येत आहे.

 

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची पुर्नरचना होणार हे निश्चित झाले आहे. जत तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे कळते.त्यात माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघ नव्याने निर्माण होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.त्यामुळे माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघातून नवे उमेदवार समोर येत आहेत.जत पुर्व भागातील युवा वैद्यकीय व्यवसायिक तथा सामाजिक नेते डॉ.सार्थक हिट्टी यांच्या नावाची माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघासाठी उमेदवार म्हणून चर्चा जोर धरत आहे.भाजपाने त्यांच्या वैद्यकीय आघाडीची तालुक्याची जबाबदारी देत बळ दिले आहे.

डॉ.हिट्टी यांनी माडग्याळ येथे परिसरातील जनतेच्या सोयीसाठी त्यांनी सर्व सोयीयुक्त मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल उभारले आहे.थ्रीडी/फोर डी सोनोग्राफी सेंटर,ब्लड स्टोरेज,बालकासाठी अतिदक्षता विभाग,अत्याधुनिक उपचारासाठी मशनरी त्यांनी माडग्याळ येथील हॉस्पिटल येथे आणल्या आहेत.विशेष करून महिलासाठी हे हॉस्पिटल वरदान ठरले आहे.पुर्व भागातील कष्टकरी जनतेसाठी माफक दरात येथे उपचार केले जात आहेत.

 

त्याशिवाय डॉ.सार्थक हिट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब,डॉ.सार्थक हिट्टी युथ फांऊडेशन,भागीरथी पतसंस्था,भागीरथी उद्योग समुहाच्या माध्यमातून ते माडग्याळ परिसरात कार्यरत आहेत.युवकांच्या हाताला काम देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहेत.या संस्थाच्या माध्यमातून डॉ.सार्थक हिट्टी यांनी मोफत आरोग्य शिबिरे,पाणीपोई,वाचनालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे,पतसंस्थेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यवसायिकांना कर्जपुरवठा करत स्वंयपुर्ण करण्याचे सामाजिक काम करत आहेत.

 

लोकचळवळीतील युथ लिडर म्हणून माडग्याळसह पुर्व भागात डॉ.सार्थक हिट्टी यांनी नावलौकिक मिळविला आहे.सामाजिक काम करत त्यांनी राजकारणात उतरून समाजसेवा करावी,यासाठी जनतेचा आग्रह होत आहे.त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणूकीत ते माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख दावेदार आहेत,एवढे निश्चित आहे.
समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे
माझे समाजाप्रती असणारी अस्था गप्प बसू देत नाही.या भागाची दुष्काळी प्रतिमा बदलायची आहे.मी वैद्यकीय व्यवसाय संभाळत सातत्याने सामाजिक काम करत आहे.माझ्या हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत या भागातील रूग्णांना आपल़्या जवळ अगदी माफत दरात उपचाराची सोय उपलब्ध केली आहेत.जनहितासाठी सामाजिक उपक्रमही आम्ही सतत राबवित आहोत.जनतेने आग्रह केल्यास माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघातून मी निवडणूक लढविणार आहे.समाजाचे हित हेच माझे ब्रिद असून या भागात सर्वांगीण विकास करणे हे माझे ध्येय आहे.
डॉ.सार्थक हिट्टी
युवा नेते,माडग्याळ
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.