माडग्याळमध्ये हिट्टी फाउंडेशनकडून पाणपोई

0
माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ,(ता.जत)येथील डॉ.सार्थक हिट्टी यांच्या युथ फाऊंडेशन माडग्याळ यांच्यावतीने मोफत पाणपोई उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या पाणपोईचे उद्घाटन माजी आरोग्य व शिक्षण सभापती तमाणगोंडा रवीपाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

 

यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती तमाणगोंडा रवीपाटील, मार्केट कमिटी तज्ञ संचालक विठ्ठल निकम,डॉ. शेखर हिट्टी,युवा नेते कामाणा बंडगर, महाराष्ट्र पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन निकम,स्वप्निल माळी,पांडुरंग कोळी,बाळापा कोरे,सुरेश हक्के, नेताजी खरात, तानाजी कदम आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

माडग्याळमध्ये नागरिकांसाठी मोफत पाणपोई सुरु केली आहे.माडग्याळ बाजारपेठमध्ये भागातील सनमडी, मायतळ,घोलेशर, उटगी, सोन्याळ, लामाणतांडा, कोळगिरी, वळसंग  परीसरातील नागरिक खरेदीसाठी माडग्याळ येत असतात. तसेच स्थानिकांची ही नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये म्हणून डॉ.सार्थक हिट्टी यांच्या युथ फाऊंडेशन वतीने पाणपोई सुरु केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.