खा. संजयकाका पाटील यांच्या ऑफिससमोर कॉग्रेसचे आंदोलन

0

 

सांगली : महाराष्ट्रातील काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवला या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काँग्रेसद्वेषी व्यक्तव्याविरोधात सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. संजयकाका पाटील यांच्या ऑफिससमोर आंदोलन केले. यावेळी समवेत जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत,प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मोदींनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेसनेच उत्तर प्रदेशात कोरोना पसरवला, हे विधान दुर्दैवी तर आहेच पण महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारे आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमानी लोकांची खाण आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. आपल्या अपमानाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

 

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, मध्यप्रदेश अशा देशातील बहुतांश राज्यातील तरुण नोकऱ्या, रोजगार, व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात येतात. आणि त्यांना महाराष्ट्र सर्वाधिक सुरक्षित राज्य वाटतेय हे काँग्रेस पक्षाने राबविलेल्या ध्येय,धोरणांचा परिणाम आहे.

Rate Card

नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रद्वेष आणि गुजरातप्रेम जुनेच आहे. केंद्रीय सत्तेत आल्यानंतर अनेक बँकांची ऑफिसेस तसेच मुख्य सरकारी कार्यालये गुजरातला हलवण्याचा सिलसिला हा मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे त्यांचे षडयंत्र लपून राहिलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.