उमदी,महेश हडपद :
मौजे उमदी येथील जत रस्ता ते घुले वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व मुरुमीकरण या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले. यावेळी समवेत उमदी येथील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्याच्या खडीकरण व मुरमीकरणामुळे येथील पादचारी व वाहनधारकांना नक्कीच लाभ होणार आहे. खराब रस्त्यामुळे पावसाळयामध्ये येथील नागरिकांना सोसावा लागणारा नाहक त्रास आता कमी होणार आहे.
सुसलाद येथे उमदी-सुसलाद-अक्कळवाडी-गिरगाव-लवंगा रस्ता प्रजिमा 73 किमी 5/400 ते 5/700 मध्ये बोर नदीवर फरशी पुल बांधकामाचे व पाटील वस्ती ते निंबर्गी वस्ती रस्ता मुरमिकरण या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी समवेत येथील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
सदर पुलाच्या बांधकामामुळे येथील ग्रामस्थांना याचा लाभ होणार आहे. सुसलादच्या पुढील गावांना जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. त्याच्या उभारणीमुळे येथील स्थानिक शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व नोकरदार वर्गास तो फायदेशीर ठरणार आहे.
हेही वाचा
जतच्या डॉ.कोमल पवार यांचे कार्डियोलॉजी सुपर स्पेशालिस्ट परीक्षेत यश
दरम्यान सुसलाद येथे उमदी-सुसलाद-अक्कळवाडी-गिरगाव-लवंगा रस्ता प्रजिमा 73 किमी 5/400 ते 5/700 मध्ये बोर नदीवर फरशी पुल बांधकामाचे व पाटील वस्ती ते निंबर्गी वस्ती रस्ता मुरमिकरण या कामाचे भूमिपूजनही आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले. यावेळी समवेत येथील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.