राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची नागठाणे येथे कारवाई | उत्पादन शुल्क विभागाची माहिती

0
सातारा : नागठाणे ता.जि.सातारा गावच्या हद्दीत बाबा पंजाबी ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा क्लोरेल हायड्रेड चा वापर करुन बनावट ताडी तसेच मानवी शरीरास घातक व विषारी क्लोरेल हायड्रेट तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून  संबंधितांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, सातारा  अधीक्षक अनिल चासकर यांनी दिली आहे.
Rate Card

या कारवाईमध्ये  सुहास हणमंत सांळुखे, विजय जयसिंग सांळुखे, मे.कानी ओव्रसिस कार्पोरेशन, अतित ता.जि.सातारा कंपनीचा मालक मिलींद तुकाराम घाडगे सर्व राहणार नागठाणे ता.जि.सातारा यांना  17 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली असून फरार आरोपी   राजू व्यंकट नरसय्या भिमानाथीनी, रा.नेवोलीनाका, डोंबिवली कल्याण पूर्व जि.ठाणे यास दि.25 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करुन त्यांचे विरुदध 1) महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65(ब)(ड)(ई) (फ),68,81,83,90,103 प्रमाणे. 2) विष कायदा 1919 चे कलम 2 व 6 चे उल्लंघन 3) महाराष्ट्र विष नियम 1972 चे कलम 2 फ मध्ये क्लोरेल हायड्रेट समाविष्ट असुन 3 व 12 चे उल्लंघन 4) भारतीय दंडविधान संहिता 1860 चे नियम क्र.328 अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.

 

वरील सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली असून गुन्हयातील संशयीत फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या  कारवाईमध्ये 150 लि क्लोरेल हायड्रेड युक्त बनावट ताडी, 735 कि.ग्रॅ. क्लोरेल हायड्रेड, एक चारचाकी वाहन एक 200 लि. क्ष.चा प्लॅस्टिक बॅरल व एक कॉम्प्रेसरसह एकूण 5,97,110/- रुपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

या कारवाईमध्ये निरीक्षक श्री.आर.एल.पुजारी, दुय्यम निरीक्षक श्री.के.बी.बिरादार, दुय्यम निरीक्षक श्री.नंदू क्षीरसागर, सहा.दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम यांनी भाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास श्री. के.बी.बिरादार दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत.

वरील आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी तयार करुन बनावट ताडी व त्यासाठी लागणारे क्लोरेल हायड्रेट तयार केल्याचे निष्पन्न  झालेले आहे अशा प्रकारची आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी बनावट ताडी व क्लोरेल हायड्रेटची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास तात्काळ देण्यात यावी, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग, सातारा  अधीक्षक श्री. चासकर, सातारा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.